गदर २ ठरला ब्लॉकबास्टर आता बॉर्डर २ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सनी देओलने आकारले तब्बल इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 07:15 PM2023-10-15T19:15:24+5:302023-10-15T19:18:54+5:30

‘गदर 2’च्या या प्रचंड यशानंतर आता सनी देओलच्या आणखी एका हिट चित्रपटाच्या सीक्वेलची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

After 'Gadar 2' success, Sunny Deol to be back with 'Border 2' | गदर २ ठरला ब्लॉकबास्टर आता बॉर्डर २ येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सनी देओलने आकारले तब्बल इतके कोटी

गदर २ ठरला ब्लॉकबास्टर आता बॉर्डर २ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता  सनी देओल सध्या गदर 2 चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. ‘गदर 2’च्या या प्रचंड यशानंतर आता सनी देओलच्या आणखी एका हिट चित्रपटाच्या सीक्वेलची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. तो म्हणजे ‘बॉर्डर’.

बॉर्डर 2 चित्रपटाची शूटिंग 2024 मध्ये सुरु केले जाणार आहे. इतकेच नाही तर बॉर्डर 2 चित्रपटासाठी सनी देओल याने तब्बल 50 कोटी फिस घेतलीये, अशी चर्चा आहे. शिवाय, चित्रपटाच्या कमाईमध्येही सनीचा काही हिस्सा असणार आहे.  या चित्रपटाची कथा अद्याप समोर आली नसली तरी तो पुन्हा कोणत्या ना कोणत्या युद्धावर आधारित असणार हे स्पष्ट झाले आहे.

देशभक्तीपर चित्रपट म्हटल्यावर आजही अनेकांच्या डोळ्यासमोर येणारे पहिले नाव म्हणजे ‘बॉर्डर’. हा मल्टीस्टारर चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पाहताना आजही डोळ्याच्या कडा पाणावतात. भारत-पाकिस्तान युद्धाची कथा असणाऱ्या या चित्रपटाचे अनेक चाहते आहेत. 

Web Title: After 'Gadar 2' success, Sunny Deol to be back with 'Border 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.