Gadar 2 नंतर सनी देओल दिसणार या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 06:06 PM2023-08-19T18:06:12+5:302023-08-19T18:07:10+5:30
Sunny Deol : सनी देओलच्या गदर २ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
सनी देओल (Sunny Deol) त्याच्या नवीनतम अॅक्शन चित्रपट गदर २ (Gadar 2) द्वारे बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत आहे. आता प्रेक्षक आपल्या आवडत्या स्टारला अधिकाधिक पाहण्यासाठी आसुसले आहेत. बॉर्डर(Border)च्या निर्मात्यांनी आता त्यांच्या ब्लॉकबस्टर वॉर ड्रामा बॉर्डरचा सिक्वेल त्याच्यासोबत आणण्याची योजना आखली आहे. होय. गदर-२ आणि सनी देओलने निर्माण केलेल्या क्रेझने दिग्दर्शक-निर्माता जेपी दत्ता आणि त्यांची मुलगी निधी दत्ता यांना २६ वर्षांच्या ब्लॉकबस्टरचा सीक्वल आणण्यासाठी प्रेरित केले आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, बॉर्डर २ची कथा गेल्या काही वर्षांपासून तयार आहे आणि सध्या या प्रोजेक्टसाठी एका मोठ्या स्टुडिओसाठी निर्माते चर्चा करत आहेत. पोर्टलने एका स्त्रोताचा हवाला देत म्हटले आहे की, "बॉर्डर हा भारतीय सिनेमातील सर्वात ऐतिहासिक ब्लॉकबस्टर्सपैकी एक आहे आणि जो सिक्वेलसाठी पात्र आहे. टीम गेल्या २ ते ३ वर्षांपासून बॉर्डरचा सिक्वेल बनवण्याबद्दल चर्चा करत आहे आणि आता सर्व काही ठीक आहे. कारण टीम लवकरच बॉर्डर २ची अधिकृत घोषणा करण्यास तयार आहे आणि ते मोठ्या पडद्यावर आणण्याच्या तयारीत आहेत.
लवकरच बॉर्डर २ची करण्यात येणार घोषणा
१९९७ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ब्लॉकबस्टर चित्रपटात सनी देओल व्यतिरिक्त सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, पुनीत इस्सार, सुदेश बेरी आणि इतरांसोबत भूमिका केल्या होत्या. बॉर्डर २ चे निर्माते सनीला प्रीक्वलमधून कायम ठेवण्याचा विचार करत आहेत. सूत्राने पोर्टलला सांगितले की, "एक भारी अॅक्शन चित्रपट असल्याने, टीम बॉर्डरच्या संपूर्ण टीमला एकत्र आणण्याऐवजी तरुण पिढीतील कलाकारांना कास्ट करेल. चित्रपटात दिसणारा बॉर्डरचा बहुधा सनी देओल हा एकमेव अभिनेता असेल." सध्या हे सर्व प्राथमिक टप्प्यात आहे आणि लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल.