‘स्कॅम 2003’ लवकरच! हर्षद मेहता नंतर आणखी एका घोटाळेबाजाची स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 04:42 PM2021-03-04T16:42:47+5:302021-03-04T16:43:17+5:30
‘Scam’ Season 2 : 2020 ची सर्वात चर्चित आणि सर्वाधिक पाहिली गेलेली वेबसीरिज कोणती तर ‘स्कॅम 1992- द हर्षद मेहता स्टोरी’. तुम्हीही या सीरिजच्या प्रेमात असाल तर तुमच्यासाठी एक फक्कड बातमी आहे.
2020 ची सर्वात चर्चित आणि सर्वाधिक पाहिली गेलेली वेबसीरिज कोणती तर ‘स्कॅम 1992- द हर्षद मेहता स्टोरी’. या सीरिजवर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्यात. तुम्हीही या सीरिजच्या प्रेमात असाल तर तुमच्यासाठी एक फक्कड बातमी आहे. होय, या ‘स्कॅम’ फ्रेंन्चाइजीचा दुसरा सीझन ‘स्कॅम 2003’ लवकरच तुमच्या भेटीस येतोय. हा दुसरा सीझनही हंसल मेहता दिग्दर्शित करणार आहेत.
आज गुरुवारी ‘स्कॅम 2003’ची घोषणा करण्यात आली. या दुसºया सीझनची कथा पत्रकार संजय सिंह यांच्या पुस्तकावर आधारित असेल.
‘स्कॅम 1992- द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज सोनी लिव्हवर रिलीज झाली होती. या सीरिजमध्ये अभिनेता प्रतीक गांधीने हर्षद मेहताची मुख्य भूमिका साकारली होती. आता ‘स्कॅम 2003’मध्ये कोणाची स्टोरी पाहायला मिळेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेन तर याचे उत्तर आहे तेलगी.
💥 SCAM ALERT! 💥
— Applause Entertainment (@ApplauseSocial) March 4, 2021
We are thrilled to announce the 2nd season of our popular 'Scam' franchise - 'Scam 2003: The Curious Case of Abdul Karim Telgi'. pic.twitter.com/p0hPitrYGd
सेकंड सीझनमध्ये तेलगीची स्टोरी...
‘स्कॅम 2003 - द क्युरिअर केस आॅफ अब्दुल करीम तेलगी’ मध्ये स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार तेलगीची कथा पाहायला मिळणार आहे. देशातील 12 राज्ये, 176 कार्यालयांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक विक्रीचे साम्राज्य उभे करणारा तेलगी अतिशय सामान्य कुटुंबात जन्मला होता. अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या तेलगीने संपूर्ण यंत्रणा हादरवून टाकणारा गुन्हा केला आणि भारतीय प्रशासकीय व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमधील भंगारात काढलेली मशीन विकत घेऊन तेलगीने मुद्रांक छपाई केले आणि ते विकून कोट्यावधीची माया जमवली होती. या घोटाळ्याशी संबधित एका प्रकरणात तेलगीला 30 वर्षे कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती. एका वर्षाने आणखी एका गुन्ह्यात त्याला 13 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 2017 मध्ये तेलगीचा मृत्यू झाला.