“जय श्री राम…”नंतर आदिपुरुष चित्रपटातील दुसरं गाणं "राम सिया राम" होणार या तारखेला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 03:47 PM2023-05-26T15:47:15+5:302023-05-26T15:50:05+5:30

प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची ...

After "Jai Shri Ram..." the second song from Adipurush movie "Ram Siya Ram" will release on this date | “जय श्री राम…”नंतर आदिपुरुष चित्रपटातील दुसरं गाणं "राम सिया राम" होणार या तारखेला रिलीज

“जय श्री राम…”नंतर आदिपुरुष चित्रपटातील दुसरं गाणं "राम सिया राम" होणार या तारखेला रिलीज

googlenewsNext

प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील महिन्यात १६ जून रोजी प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला. आता चित्रपटातील जय श्री राम (Jai Shri Ram Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळाली.  

आता या सिनेमातलं दुसरं गाणं ''राम सिया राम" प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २९ मे २०२३ रोजी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत असंख्य प्लॅटफॉर्मवर "राम सिया राम" हे चित्रपटातील दुसरं लॉन्च करणार आहेत.
 
या चित्रपटात प्रभास प्रभू रामाच्या भूमिकेत, क्रिती माता सीतेच्या भूमिकेत आणि सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष'  या चित्रपटात मराठमोळा  देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकेतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट टी-सिरीजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, आणि त्याचबरोबर ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्स मधील राजेश नायर यांनी निर्मित केला आहे आणि १६ जून २०२३ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होईल.
 

Web Title: After "Jai Shri Ram..." the second song from Adipurush movie "Ram Siya Ram" will release on this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.