जान्हवी कपूर पाठोपाठ खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, खुद्द करण जोहरनेच दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 12:21 PM2018-12-29T12:21:43+5:302018-12-29T12:29:42+5:30
आपली फॅशन, स्टाईल याबाबत खुशी बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची खुशी विशेष खबरदारी घेते.
आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही.
आपल्या पालकांपेक्षा ''हम भी कुछ कम नहीं'' असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे असे बड्या बड्या स्टार कलाकारांची मुलांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
यापैकी काहींचे सिनेमे रिलीज झाले काहींचे रिलीज होणे बाकी आहे. या स्टारकिडसमध्ये अनेक नावे असले तरीही आता आणखीन एका नाव लवकरच सामील होणार आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूरनंतर बहिण खुशी कपूर लवकरच बॉलीवुडमध्ये एंट्री करणार असल्याचे संकेत बॉलीवुडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने दिले आहेत.
नुकतेच नेहा धूपियाचा शो नो फिल्टरमध्ये करण जोहरने हजेरी लावली होती. यावेळी नेहाने करणला प्रश्न विचारला की, 2019मध्ये कोणकोणते स्टार किड रूपेरी पडद्यावर झळकू शकतात? नेहाच्या विचारलेल्या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता करणने खुशी कपूर आणि जावेद जाफरीचा लेक मिजानही बॉलिवूडमध्ये येणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे संजय लीला भंसाली जावेद जाफरीचा लेक मिजानला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याच्या तयारी असल्याच्याही चर्चा ऐकायला मिळत आहे.
आपली फॅशन, स्टाईल याबाबत खुशी बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची खुशी विशेष खबरदारी घेते. बॉलीवुडचे इव्हेंट्स, पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये जान्हवी बरोबर खुशी कपूरही आवर्जु उपस्थित असते.श्रीदेवी यांच्याप्रमाणेच खुशी सौंदर्यांत कुठेही कमी नसून साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
'धडक' या सिनेमाच्या निमित्ताने जान्हवी कपूर आणि इशान खट्टर ही नवी जोडी रसिकांच्या भेटीला आली. अगदी त्याचप्रमाणे खुशी कपूर आणि मिजान ही फ्रेश जोडी रसिकांच्या भेटीला आल्यास आश्चर्य वाटु नये.