कार्तिक आर्यननंतर जान्हवी कपूरला 'दोस्ताना २'मधून दाखवणार बाहेरचा रस्ता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 16:53 IST2021-05-05T16:53:25+5:302021-05-05T16:53:59+5:30
गेल्या काही दिवसांपासून दोस्ताना २ चित्रपटाची चर्चा होताना दिसते आहे.

कार्तिक आर्यननंतर जान्हवी कपूरला 'दोस्ताना २'मधून दाखवणार बाहेरचा रस्ता?
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा आगामी चित्रपट दोस्ताना २ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. या चित्रपटातून करण जोहरनेकार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर खूप वाद निर्माण झाले होते. त्यानंतर करण जोहरला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते. कार्तिक आर्यन अगदी 'अनप्रोफेशनल' असल्याचे करण जोहरने म्हटले होते. त्याच्या जागेवर अक्षय कुमारची निवड झाल्याचेही बोलले जात होते.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर दोस्ताना २सोबत घराणेशाहीच्या वादाला पूर्णविराम लावण्याचा विचार करतो आहे. 'दोस्ताना २′ वरून करण जोहरवर पुन्हा एकदा नेपोटिझमवरून टीका केली जात होती. हा वाद संपवण्यासाठी आता करण जोहर एक मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.
'दोस्ताना २'मध्ये जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. स्वतःवरील आरोप खोडून काढण्यासाठी आता जान्हवीलाही डच्चू देणार असल्याचे समजते आहे.
करण जोहरने जान्हवीच्या निवडीसाठी क्रिएटिव्ह टीम आणि दिग्दर्शकाशी खूप वाद घातला होता. त्याने केलेल्या निवडीमध्ये अक्षय कुमार, राजकुमार राव, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि सिद्धांत चतुर्वेदीचा समावेश आहे. आता नेपोटिझमचा मुद्दा कोणीही उपस्थित करू नये, यासाठी आता आपल्या या स्टारकास्टमध्ये कोणीही वशिलेबाजी केलेली असू नये, यासाठी जान्हवीला बाहेर काढण्याचा करणचा विचार आहे.