कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रानंतर या अभिनेत्रीने गुपूच बांधली लगीनगाठ, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 17:29 IST2023-02-23T17:00:55+5:302023-02-23T17:29:30+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहतायेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीनंतर अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांनी लग्न केले. आता या यादीत आणखी एक अभिनेत्रीचं नाव सामील झाले आहे.

कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रानंतर या अभिनेत्रीने गुपूच बांधली लगीनगाठ, फोटो झाले व्हायरल
Maanvi Gagroo Married Kumar Varun:बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहतायेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीनंतर अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांनी लग्न केले. आता या यादीत आणखी एक अभिनेत्रीचं नाव सामील झाले आहे. अभिनेत्री मानवी गाग्रूने 23 फेब्रुवारीला जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थित स्टँड-अप कॉमेडियन कुमार वरुणसोबत लगीनगाठ बांधली केले आहे. कपलने त्यांच्या लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.
मानवी-कुमार वरुणने शेअर केले लग्नाचे फोटो
जानेवारीमध्ये आपल्या साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर, कपलने गुरुवारी त्यांच्या लग्नातील काही मोजकेच फोटो पोस्ट केले आहेत. मानवी लाल रंगाच्या आऊटफिट खूप सुंदर दिसत होती तर वरुणने व्हाईट कलरची शेरवानी परिधान केली होती. मानवी आणि कुमार वरुण यांनी आज संध्याकाळी एक पार्टी देण्याची प्लनिंग केली आहे.
फोटो पोस्ट कॅप्शनमध्ये लिहिले की, आज 23-02-2023 रोजी आमचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत आम्ही याला ऑफिशियल केलं. तुम्ही आमच्या वैयक्तिक प्रवासात आम्हाला प्रेम आणि पाठिंबा दिला आहे, आमच्या या प्रवासात आम्हाला आशीर्वाद द्या. Happy #2323 #KGotVi."
मानवी गाग्रूने पिचर्स, ट्रिपलिंग्ज आणि 'फोर मोअर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. या अभिनेत्रीने 'पीके', 'उजदा चमन' आणि 'शुभ मंगल यादा सावधान' यांसारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर कुमार वरुण एक लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन असण्यासोबतच एक क्विझ मास्टर देखील आहे. त्याने 'लखों में एक' आणि 'चाचा विधायक हैं हमारे' सारख्या शोमध्येही काम केले आहे.