Vijay Deverakonda : ‘लाइगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 10:16 AM2022-09-04T10:16:25+5:302022-09-04T10:19:46+5:30

Vijay Deverakonda : ना प्रमोशनची जादू चालली, ना विजय देवरकोंडाच्या स्टारडमची. 120 कोटीत तयार झालेल्या ‘लाइगर’ सिनेमाने केवळ 40 कोटींचा बिझनेस केला. आता या नुकसानाची भरपाई कोण करणार?

after liger flop vijay deverakonda took a big step to compensate the loss | Vijay Deverakonda : ‘लाइगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

Vijay Deverakonda : ‘लाइगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवरकोंडाने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda ) ‘लाइगर’ (Liger) हा सिनेमा यंदाच्या बहुप्रतिक्षीत सिनेमांपैकी एक होता. रिलीजआधी या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ होती. पण सिनेमा रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर. सिनेमाने सगळ्यांचीच निराशा केली. चित्रपट दणकून आपटला. विजय देवरकोंडानं प्रमोशनसाठी दिवसरात्रं एक केला. मात्र ना प्रमोशनची जादू चालली, ना विजय देवरकोंडाच्या स्टारडमची. 120 कोटीत तयार झालेल्या या सिनेमाने केवळ 40 कोटींचा बिझनेस केला. आता या नुकसानाची भरपाई कोण करणार? तर आता विजय देवरकोंडा व ‘लाइगर’चे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

काय घेतला निर्णय?
‘लाइगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजयला त्याचा आगामी सिनेमा ‘जन गण मन’ची चिंता सताऊ लागली आहे. विजयचा हा चित्रपट सुद्धा पुरी जगन्नाथ हेच डायरेक्ट करत आहेत. ‘लाइगर’ दणकून आपटला तेव्हापासून मेकर्सला धडकी भरली आहे. अशात विजय व पुरी जगन्नाथ मेकर्सच्या नुकसानाची भरपाई करू इच्छितात. ते कसं? तर ‘जन गण मन’साठीच्या फीवर पाणी सोडून. होय, चर्चा खरी मानाल तर विजय देवरकोंडा व दिग्दर्शक पुरी दिग्गनाथ यांनी ‘जन गण मन’ या आगामी चित्रपटासाठी फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बजेट अर्धा
रिपोर्टनुसार, ‘जन गण मन’चा बजेटही घटवून अर्धा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर आता कथेवरही फेरविचार सुरू आहे. चर्चा खरी मानाल तर, पुरी जगन्नाथ यांनी आधी हा सिनेमा महेबबाबूला ऑफर केला होता. पण महेशबाबूसोबतची चर्चा फिस्कटली. यानंतर ‘लाइगर’च्या शूटींगदरम्यान पुरी जगन्नाथ यांनी विजय देवरकोंडाला ‘जन गण मन’ची कथा ऐकवली. त्याला ती भलतीच आवडली आणि त्याने हा सिनेमा करण्यास होकार दिला. ‘जन गण मन’ हा विजयचा सिनेमा पुढील वर्षी 3 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हिंदी, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेत तो रिलीज होणार आहे.

Web Title: after liger flop vijay deverakonda took a big step to compensate the loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.