कंगना राणौतचा निर्धार पक्का! दिग्दर्शित करणार आणखी एक सिनेमा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 14:49 IST2019-04-10T14:48:30+5:302019-04-10T14:49:54+5:30
‘मणिकर्णिका’ हा चित्रपट कंगना राणौतचा पहिला दिग्दर्शित केलेला सिनेमा होता. या चित्रपटानंतर कंगनाने दिग्दर्शक म्हणून आपल्या दुस-या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे.

कंगना राणौतचा निर्धार पक्का! दिग्दर्शित करणार आणखी एक सिनेमा!!
‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट कंगना राणौतचा पहिला दिग्दर्शित केलेला सिनेमा होता. या चित्रपटानंतर कंगनाने दिग्दर्शक म्हणून आपल्या दुस-या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. कंगनाचा हा सिनेमा एक एपिक अॅक्शन ड्रामा असेल. चित्रपटाची स्क्रिप्टही फायनल झालीय. खुद्द कंगनाने याचा खुलासा केला.
डीएनएला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने याबाबत महिती दिली. मी लवकरच माझ्या डायरेक्टोरियल प्रोजेक्टची घोषणा करणार आहे. हा एक अॅक्शन ड्रामा असेल. एक एपिक ड्रामा. या चित्रपटाची स्क्रिप्ट फायनल करण्यासाठी मी माझा बराच वेळ खर्ची घातला. सध्या सगळे काही क्रमवार लावण्याचे काम सुरु आहे. स्क्रिप्ट फायनल झालीय. लवकरच आम्ही एक फोटोशूट करू आणि यानंतर या चित्रपटाचे पोस्टर जारी करू, असे कंगनाने सांगितले. ‘मणिकर्णिका’मध्ये अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून काम करण्याचा अनुभव शानदार होता. दिग्दर्शक या नात्याने मी केलेल्या कामावर मी प्रचंड खूश आहे. पुढचा चित्रपट दिग्दर्शित करण्याची माझ्यासाठी हीच खरी वेळ आहे, असेही कंगना यावेळी म्हणाली.
हा चित्रपट एक बिग बजेट सिनेमा असेल. पण कंगनाचे मानाल तर, आत्तापर्यंत आलेल्या अनेक बिग बजेट सिनेमांपेक्षा अगदी वेगळा. चित्रपटासाठी मोठा बजेट मिळणे कठीण असते. पण ‘मणिकर्णिका’च्या यशानंतर बजेट मिळणे फार अवघड नाही, असे कंगनाचे मत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मणिकर्णिका’प्रमाणेच कंगनाचा हा नवा प्रोजेक्टही रिअल लाईफ कथेवर आधारित आहे. तूर्तास कंगना ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटात बिझी आहे. याशिवाय जयललितांच्या बायोपिकमध्येही ती झळकणार आहे.