​लग्नानंतर हेजल किच झाली गुरुबसंत कौर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2016 09:42 PM2016-12-02T21:42:40+5:302016-12-02T21:42:40+5:30

क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मॉडेल व अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. पंजाबी पद्धतीनुसार दोघांचे लग्न झाले. मात्र या ...

After marriage, hezal went after Gurubasant Kaur | ​लग्नानंतर हेजल किच झाली गुरुबसंत कौर

​लग्नानंतर हेजल किच झाली गुरुबसंत कौर

googlenewsNext
ong>क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मॉडेल व अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. पंजाबी पद्धतीनुसार दोघांचे लग्न झाले. मात्र या लग्न सोहळ्यानंतर  हेझल कीचचे नाव क्रिकेटर युवराज सिंहशी लग्न झाल्यानंतर बदलले आहे. ती आता गुरुबसंत कौर झाली आहे. हे नाव युवराजच्या आईने सुचवल्याचा खुलासा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी केला आहे. 

मागील दोन दिवसांत युवराज सिंग व हेजल किच यांच्या लग्नाची मीडियात चांगलीच चर्चा होत आहे. फतेहगड स्थित गुरुद्वारमध्ये युवराज आणि हेझल लग्नबंधनात अडकले. शीख परंपरेनुसार हा विवाह पार पडला. या सोहळ्यास युवराज आणि हेझलचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. आता दोघांचा हिंदू परंपरेनुसार युवराज आणि हेझलचा विवाह होणार आहे. गोव्यात हा सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर दिल्लीत रिसेप्शन होणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह अनेक बडी मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

yuvraj - hejal

हेजलने युवराजसोबत लग्नासाठी आपले नवा बदलले असल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी सोशल मीडियावर हेजलने नाव बदलल्याची चांगलीच चर्चा होती. युवराज आपल्या लग्न सोहळ्यात व्यस्त असला तरी तो सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टिव्ह होता. त्याने नवरदेव होण्यापासून ते लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल नेटवर्किं ग साईटवर अपलोड केले होते. 

यातूनच ही माहिती मिळाली आहे. सामन्यत: भारतात लग्न झाल्यावर नवरीचे नाव बदलण्याची पद्धत रुढ आहे. शिवाय दोघांचा विवाह गुरुद्वारामध्ये झाला असल्याने कदाचित हेजलने आपले नाव बदलले असावे असा अंदाज लावण्यात येत आहे. वेल काहीही असो हेजलला मिळालेले नवे नावही चांगलेच आहे. आता हेजल किच नव्हे गुरुबसंत कौर!

Web Title: After marriage, hezal went after Gurubasant Kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.