मुलीचा बुरखा घातलेला फोटो शेअर केल्यामुळे ट्रोल झाला ए. आर. रेहमान, आता शेअर केला हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 12:26 PM2019-02-09T12:26:34+5:302019-02-09T12:43:06+5:30

ए. आर. रेहमान मुलगी खातिजाने बुरखा परिधान केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे ट्रोल झाला होता. त्यानंतर आता आणखीन एक आपल्या मुलांचा फोटो शेअर केला आहे.

after-niqab-controversy-ar-rahman-shares-adorable-photo-of-his-kids- | मुलीचा बुरखा घातलेला फोटो शेअर केल्यामुळे ट्रोल झाला ए. आर. रेहमान, आता शेअर केला हा फोटो

मुलीचा बुरखा घातलेला फोटो शेअर केल्यामुळे ट्रोल झाला ए. आर. रेहमान, आता शेअर केला हा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देरेहमान सोशल मीडियावर झाला ट्रोलट्रोल झाल्यानंतर रेहमानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या तिन्ही मुलांचा स्पेशल फोटो शेअर केला आहे.

संगीतकार ए. आर. रेहमानने दोन दिवसांपूर्वी निता अंबानींसोबत त्याच्या पत्नी आणि मुलींचा फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याच्या मुलीने बुरखा परिधान केला होता. या फोटोमुळे ए. आर. रेहमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

रेहमानने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर फोटो शेअर केला होता. निता अंबानी यांच्यासोबत माझ्या कुटुंबातील महिला खतिजा, रहीमा आणि सायरा फ्रिडम टू चूज असा हॅशटॅगही त्याने पोस्ट केला आहे. या फोटोत खतिजाने बुरखा घातला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रेहमानला ट्रोल केले आहे.


त्यानंतर आता रेहमानने सोशल मीडियावर आणखीन एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोतून रेहमानने सांगण्याचा प्रयत्न केला आहे की खतिजाने बुरखा परिधान करणे किंवा नाही हे तिचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र या फोटोमुळे पुन्हा रेहमान सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. मात्र खतिजाने यावर आपले मत व्यक्त केले आहे. ती म्हणाली की, मला बुरखा घालण्यासाठी कोणी जबरदस्ती केलेली नाही. मी बुरखा परिधान करते कारण मला आवडते. मी अॅडल्ट आहे त्यामुळे मला माहित आहे काय परिधान करायचे आणि काय नाही. 


या विवादानंतर रेहमानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या तिन्ही मुलांचा स्पेशल फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये खातिजा खुर्चीवर बसली आहे. रहिमा व आमीन तिच्या बाजूला उभे आहेत. हे मॅगझिनसाठी केलेले फोटोशूट होते. या फोटोत ते तिघे खूप छान दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खातिजा व आमीन ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहेत. तर रहिमाने गोल्डन रंगाचा गाऊन परिधान केला आहे. 

Web Title: after-niqab-controversy-ar-rahman-shares-adorable-photo-of-his-kids-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.