​ ‘आॅस्कर’नंतर ए. आर. रहमानच्या नावावर आणखी एक ‘विक्रम’!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 08:16 AM2018-02-21T08:16:27+5:302018-02-21T13:46:27+5:30

‘आॅस्कर’वर नाव कोरणारा आणि भारतीय संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला संगीतकार ए. आर. रहमान याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ...

After 'Oscars' a. R. Another 'Vikram' in the name of Rahman! | ​ ‘आॅस्कर’नंतर ए. आर. रहमानच्या नावावर आणखी एक ‘विक्रम’!

​ ‘आॅस्कर’नंतर ए. आर. रहमानच्या नावावर आणखी एक ‘विक्रम’!

googlenewsNext
ॅस्कर’वर नाव कोरणारा आणि भारतीय संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला संगीतकार ए. आर. रहमान याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. होय, अ‍ॅप्पल कंपनीच्या जाहिरातीसाठी त्याची निवड झाली आहे आणि यासोबतच अ‍ॅपलच्या जाहिरातीसाठी निवडण्यात आलेला रहमान हा पहिला भारतीय बनला आहे. त्यामुळे आता आपल्या जादुई संगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यासोबतच रहमान भारतात अ‍ॅप्पल कंपनीचा प्रचार करताना दिसेल. तूर्तास मोठ-मोठ्या शहरात रहमानचा फोटो असलेले अ‍ॅप्पलच्या जाहिरातींचे होर्डिंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या होर्डिंगवर  रहमानचा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो आहे.
आयफोन एक्समध्ये पोर्ट्रेट सेल्फी आॅप्शन आहे. रहमान याचीच जाहिरात करताना दिसतोय. टिष्ट्वट करून त्याने ही माहिती दिली आहे.  पोर्ट्रेट सेल्फी आॅप्शनचा वापर खरोखरीच खूप सोपा आहे. यात मज्जा आहे. लोकांनी फिल करावे, असे तुम्हाला वाटत असेल तर ते सगळे यात आहे. स्टुडिओ क्वॉलिटी देणारे हे आॅप्शन तुमची सेल्फी अधिक सुंदर बनवते, असे रहमानने म्हटले आहे.

ALSO READ : वडिलांकडून ए.आर.रहमान यांना मिळाला संगीताचा वारसा!

अल्लाह रक्खा रहमान हे ए. आर. रहमानचे पूर्ण नाव.  आपल्या काळामधील सर्वश्रेष्ठ संगीतकार मानल्या जात असलेल्या रहमानने आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांना संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत.    दोन आॅस्करसह, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ फिल्मफेअर पुरस्कार व १३ फिल्मफेअर असे अनेक पुरस्कार त्याने पटकावले आहेत. आजवरच्या त्याच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत त्याला भारतीय संगीताला नवी ओळख दिल्याचे श्रेय दिले जाते.  ‘दिल से’,‘ख्वाजा मेरे ख्वाजा’,‘जय हो’ आदी गाण्यांमुळे रहमान यांची ख्याती झाली. ‘बॉम्बे’,‘रंगीला’,‘दिल से’,‘ताल’,‘जींस’,‘पुकार’, ‘फिजा’, ‘लगान’,‘स्वदेस’,‘जोधा-अकबर’,‘युवराज’,‘स्लमडॉग मिलेनियर’ आणि आता ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिले आहे. 

Web Title: After 'Oscars' a. R. Another 'Vikram' in the name of Rahman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.