ऑस्करनंतर रामचरण झाला मालामाल; मिळाला हॉलिवूड प्रोजेक्ट, अभिनेत्याने दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 12:39 PM2023-03-18T12:39:13+5:302023-03-18T12:40:06+5:30

Ram Charan : आरआरआर या चित्रपटामुळे ग्लोबल स्टार बनलेल्या राम चरण सध्या चर्चेत आहे.

After Oscars, Ramcharan became a rich man; Got a Hollywood project, the actor gave a hint | ऑस्करनंतर रामचरण झाला मालामाल; मिळाला हॉलिवूड प्रोजेक्ट, अभिनेत्याने दिली हिंट

ऑस्करनंतर रामचरण झाला मालामाल; मिळाला हॉलिवूड प्रोजेक्ट, अभिनेत्याने दिली हिंट

googlenewsNext

आरआरआर (RRR) या चित्रपटामुळे ग्लोबल स्टार बनलेल्या राम चरण (Ram Charan) सध्या चर्चेत आहे. रामचरण नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहोर उमटवल्यावर भारतात परतला आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये भाग घेतला. येथे राम चरणने केवळ त्याच्या चित्रपट आणि गाण्यांबद्दलच सांगितले नाही, तर तो कोणत्या हॉलिवूड चित्रपटाचा भाग बनला आहे हे देखील सांगितले.

राम चरणने मॉडरेटर राजदीप सरदेसाई यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्याला विचारण्यात आले की, तुला ग्लोबल स्टार बनायचे आहे. तू लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसणार हे खरे आहे का? यावर उत्तर देताना राम चरण म्हणाले की, मी आता काही बोलू शकत नाही. सध्या आम्ही प्रक्रियेत आहोत. उचित वेळ आली की नक्की सांगेन. माझी आई म्हणते की सगळ्यांची नजर लागली नाही पाहिजे. आम्हा सर्वांना अशा प्रत्येक उद्योगात काम करायचे आहे जिथे प्रतिभेला महत्त्व दिले जाते.

याशिवाय राम चरणला विचारण्यात आले की टॉम क्रूझ त्याला ऑस्कर 2023 मध्ये भेटण्यासाठी शोधत होतो का? उत्तरात राम म्हणाले की नाही, तसे नाही. सध्या मला टॉम क्रूझला भेटायचे आहे. कदाचित त्याला भविष्यात मला भेटायला आवडेल. याबाबत मी सध्या काहीही बोलू शकत नाही. पण हो असे व्हावे अशी माझी इच्छा आहे. कदाचित राजामौली आगामी काळात टॉपगन चित्रपट बनवण्याची शक्यता आहे.


या इव्हेंटमध्ये राम चरणने त्याच्या वडिलांनी त्याला इंडस्ट्रीबद्दल काय शिकवले हे देखील सांगितले. राम चरण म्हणाला की, माझे वडील चिरंजीवी यांनी मला पहिल्याच दिवशी, माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी शिकवलेले एक सूत्र म्हणजे स्टाफची काळजी घेणे. त्यांचा आदर करा. जर ते तुमच्याबद्दल बोलू लागले तर तुमचे करिअर संपेल. त्यामुळे मी नेहमी माझ्या स्टाफची काळजी घेतो. माझा मेकअप मॅन, मॅनेजर, स्टायलिस्ट. माझा चित्रपट फ्लॉप झाला तरी मी माझ्या स्टाफची काळजी घेतो. पुढे, त्याने आपल्या केसांची आणि मेकअप आर्टिस्ट विपिन आणि गौरवचीही प्रेक्षकांना ओळख करून दिली.

Web Title: After Oscars, Ramcharan became a rich man; Got a Hollywood project, the actor gave a hint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.