पद्मावतीनंतर रणवीर सिंगला या भूमिकेच्या तयारीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 11:44 AM2017-10-25T11:44:53+5:302017-10-25T17:16:11+5:30

रणवीर सिंग बॉलिवूडमध्ये त्याच्या एनर्जीमुळे ओळखले जाते. एकत्र रणवीर सिंग अनेक काम करतो. सध्या तो संजय लीला भन्साळींचा आगामी ...

After Padmavati, Ranveer Singh started this role | पद्मावतीनंतर रणवीर सिंगला या भूमिकेच्या तयारीला

पद्मावतीनंतर रणवीर सिंगला या भूमिकेच्या तयारीला

googlenewsNext
वीर सिंग बॉलिवूडमध्ये त्याच्या एनर्जीमुळे ओळखले जाते. एकत्र रणवीर सिंग अनेक काम करतो. सध्या तो संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट पद्मावतीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र आपल्या व्यस्त शेड्युलमधूनही वेळ काढून रणवीरने  १९८३च्या विश्वकप विजेत्या भारतीय संघावर तयार होत असलेल्या चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे.  

नुकताच रणवीर सिंग मुंबईतल्या वांद्रेच्या फुटबॉल ग्राऊंडवर दिला. जिकडे त्याचे प्रेक्टिस सेशन सुरु होते. थोड्यावेळानंतर रणवीरसोबत ग्राऊंडवर डिनो मोरियाही फुटबॉल खेळताना दिसला. आतापर्यंत महेंद्र सिंग धोनी आणि बॉक्स मेरी कॉमच्या आयुष्यावर आलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट गेले होते. स्क्रिनवर सुशांत सिंग राजपूतने महेंद्र सिंग धोनीची भूमिका अत्यंत दमदारपण सादर केली होती तर प्रियांका चोप्राने साकारलेली मेरी कॉम प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. 
 १९८३च्या विश्वकप विजेत्या भारतीय संघावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करतो आहे. रणवीर सिंग यात त्यावेळीचे भारतीय संघाचे कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. तर रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत कॅटरिना कैफ दिसणार आहे. पहिल्यांदाच रणीवर कॅटरिनासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.  रणवीर सिंग या भूमिकेसाठी क्रिकेटचे धडे खुद्द कपिल देव यांच्याकडूनच घेणार आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या संघाने वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजला १८१ धावांनी पराभूत करीत वर्ल्डकप जिंकला होता. हा विजय भारतासाठी ऐतिहासिक होता. कपिल देव यांनी कर्णधारपद भूषविताना संघाचे संतुलनदेखील त्याकाळी योग्यरीत्या जमविले होते. शिवाय त्याकाळी ते क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाले होते. कपिल देव यांनी १९७८ ते १९९४ दरम्यान भारतीय क्रिकेट संघात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यामुळे या चित्रपटात रणवीर सिंगला कपिल देव यांची भूमिका साकारणे खूपच चॅलेजिंग असणार आहे. 

ALSO RAED :  ​रस्त्यांवर भीक मागणा-या आपल्या एका चाहतीला रणवीर सिंगने असे केले खूश! पाहा व्हिडिओ!!

रणवीर सिंगचा 1 डिसेंबरला पद्मावती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्यासह दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूरची मुख्य भूमिका आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. 

Web Title: After Padmavati, Ranveer Singh started this role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.