'राधे'नंतर 'टायगर ३'मधून सलमान खान करणार धमाका, या ठिकाणी करणार शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 19:02 IST2021-02-08T19:01:54+5:302021-02-08T19:02:24+5:30
सलमान खानचा आगामी चित्रपट टायगर ३चे शूटिंग मार्चपासून सुरू होणार आहे.

'राधे'नंतर 'टायगर ३'मधून सलमान खान करणार धमाका, या ठिकाणी करणार शूटिंग
बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट टायगर ३चे शूटिंग मार्चपासून सुरू होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग युएईमध्ये होईल, अशी चर्चा होती. पण आता समजतंय की या चित्रपटाचे शूटिंग इस्तानबुलमध्ये होणार आहे. चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्राने हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. कारण युएईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि म्हणूनच आदित्य यांनी चित्रपटाचे शूटिंग इस्तानबुलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्मात्याने चित्रपटाची टीम रेकीसाठी तुर्कीला पाठविली आहे. अबूधाबी आणि दुबईमध्ये पठाणसाठी रिहॅब येथे यशराज चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमने टायगर३ साठी रेकी देखील केली आहे. त्याचबरोबर सलमानने चित्रपटाची तयारीही सुरू केली आहे. यापूर्वी तो टायगर श्रॉफ, आयुष शर्मा आणि दिशा पटानी यांना प्रशिक्षण दिलेले फिटनेस तज्ञ राजेंद्र ढोले यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान दुबईला जाण्यापूर्वी मनीष शर्मा त्याचे मुंबईतील शूटिंग पूर्ण करून घेणार आहेत. या चित्रपटात सलमान खान रॉ एजेंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार सलमान खान शाहरुख खानच्या चित्रपट 'पठाण' मध्येही दिसणार आहे. पठाणच्या युएई वेळापत्रकात सलमान शूट करणार आहे. त्याचे १५ दिवसांचे शूट आहे.
सलमान खान पठाण, टायगर ३ चित्रपटातून फ्री झाल्यानंतर तो कभी ईद कभी दिवाली चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. मागील वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाच्या कामाला उशीर होत आहे.