Ashu Reddy' च्या पायाची पप्पीनंतर राम गोपाल वर्माच्या 'या' फोटोची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:00 PM2022-12-09T18:00:29+5:302022-12-09T18:21:11+5:30
चित्रपट दिग्दर्शक/निर्माते राम गोपाल वर्मा नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचित्र कृत्यांसह चर्चेत असतात.
Ram Gopal Varma Video: चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि विचित्र कृत्यांसह चर्चेत असतात. काल पुन्हा एकदा ते त्यांच्या एका विचित्र कृत्यासाठी चर्चेत आले आहेत. त्यांनी अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक आशु रेड्डीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ते तिच्या पायांची पप्पी घेताना दिसत आहेत, तर आज दुसऱ्याच एका फोटोवरुन चर्चेत आले आहेत.
राम गोपाल वर्मा यांचा 'डेंजरस' हा चित्रपट आज ९ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अनेक दिवसांपासून या वादग्रस्त चित्रपटाची चर्चा होती. लेस्बियन रोमान्सवर आधारित या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स पाहायला मिळणार आहेत. याशिवाय राम गोपाल वर्मा यांचा चित्रपटाचे प्रमोशन करण्याची पद्धतही चर्चेत होती. अभिनेत्री आशु रेड्डी यांची मुलाखत घेत असताना तिच्या पायाचे चुंबन घेताना तो कॅमेऱ्यात कैद झाला, त्यामुळे सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल करण्यात आले आणि आता 'डेंजरस'मधील अभिनेत्री अप्सरा राणीचा कंबरेला हात आहे. तिने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, या फोटोवरुन रामगोपाल वर्माला ट्रोल केले जात आहे.
Me and @_apsara_rani on our way to see DANGEROUS 8.45 AM show in prasad multiplex screen 5 pic.twitter.com/cEJ8tZhadf
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 9, 2022
'डेंजरस'मध्ये अप्सरा राणी आणि नैना गांगुली मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात दोघांचे जबरदस्त सीन्स पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाला A प्रमाणपत्र मिळाले आहे. अप्सरा राणीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये 'मी आणि @_अप्सरा_राणी, आम्ही प्रसाद मल्टीप्लेक्स स्क्रीन 5 वर 8.45 वाजता डेंजरस फिल्मचा मॉर्निंग शो पाहणार आहोत, अशी कॅप्शन दिली आहे.
या फोटोमध्ये अप्सरा राणी प्रिंटच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे, तर राम गोपाल वर्माने जीन्स टी-शर्ट घातलेला आहे.'डेंजरस' एप्रिलमध्ये रिलीज होणार होता पण वादग्रस्त कंटेंटवरून झालेल्या वादानंतर हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. राम गोपाल वर्मा यांच्या वादग्रस्त चित्रपटांपैकी हा एक आहे.