रणबीरनंतर तृप्ती डिमरी होणार 'या' अभिनेत्याची हिरोईन, Animal नंतर अभिनेत्रीकडे लागलीय सिनेमांची रांग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 16:22 IST2024-02-08T16:22:05+5:302024-02-08T16:22:47+5:30
Tripti Dimri : अॅनिमल चित्रपटातून रश्मिका मंदानापेक्षा जास्त लोकप्रियता तृप्ती डिमरीला मिळाली. अॅनिमलमध्ये भाभी २ नावाने ती जास्त लोकप्रिय झाली. या चित्रपटानंतर अभिनेत्रीकडे अनेक प्रोजेक्ट्सची रांग लागली आहे.

रणबीरनंतर तृप्ती डिमरी होणार 'या' अभिनेत्याची हिरोईन, Animal नंतर अभिनेत्रीकडे लागलीय सिनेमांची रांग
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor)चा अॅनिमल (Animal Movie) चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला आहे. तरीदेखील हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna)ने रणबीरच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर या चित्रपटात रणबीरचं अभिनेत्री तृप्ती डिमरी(Tripti Dimri)सोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर होते. या चित्रपटातून रश्मिका मंदानापेक्षा जास्त लोकप्रियता तृप्ती डिमरीला मिळाली. अॅनिमलमध्ये भाभी २ नावाने ती जास्त लोकप्रिय झाली. सध्या ती नॅशनल क्रश बनली आहे. या चित्रपटानंतर अभिनेत्रीकडे अनेक प्रोजेक्ट्सची रांग लागली आहे. दरम्यान आता अशी माहिती समोर आली आहे की, तृप्तीला करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या सिनेमाची ऑफर मिळाली आहे.
फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, तृप्ती डिमरी आता धर्मा प्रोडक्शन्सच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही फ्रेश जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अद्याप या चित्रपटाची आणखी कोणती डिटेल्स समोर आलेली नाही. हा प्रोजेक्ट तृप्ती आणि सिद्धांतला त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर मिळाला आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तृप्ती डिमरी आगामी दिवसात विकी कौशल सोबत मेरे महबूब मेरे सनममध्ये दिसणार आहे. या चित्रपटात दोघे रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. याशिवाय तृप्तीकडे विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ हा सिनेमा देखील आहे. यात ती राजकुमार रावसोबत झळकणार आहे.