Rishabh Pant Urvashi Rautela:'मौत से पहले भी एक और...', उर्वशीची पोस्ट वाचून ट्रोलर्सना आठवला रिषभ पंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 04:13 PM2022-09-15T16:13:30+5:302022-09-15T16:35:53+5:30

उर्वशी रौतेलाची लेटेस्ट पोस्ट वाचून ट्रोलर्सना रिषभ पंतची आठवण झालीय.

After reading Urvashi Rautela's post trollers remembered Rishabh Pant | Rishabh Pant Urvashi Rautela:'मौत से पहले भी एक और...', उर्वशीची पोस्ट वाचून ट्रोलर्सना आठवला रिषभ पंत

Rishabh Pant Urvashi Rautela:'मौत से पहले भी एक और...', उर्वशीची पोस्ट वाचून ट्रोलर्सना आठवला रिषभ पंत

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela)  ही सतत चर्चेत राहतेय... एका मुलाखती RP असा उल्लेख करून तिने भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतला डिवचले. त्यावर रिषभनेही सडेतोड उत्तर देत फिरकी घेतली. त्यात आशिया चषक स्पर्धेच्या मॅच पाहण्यासाठी उर्वशी थेट यूएईला पोहोचली. भारताच्या पराभवानंतर इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल झाला त्यात उर्वशी हसतेय आणि लगेचच दुसऱ्या फ्रेममध्ये नसीमही हसताना दिसतोय. बॅगग्राऊंड म्युझिकला रोमँटिक गाणंही वाजतंय... ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाज नसीमला याबाबत विचारले असता मी तिला ओळखतही नाही, असे उत्तर त्याने दिलं आणि उर्वशी पुन्हा ट्रोल झाली होती. दरम्यान, उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

उर्वशी यावेळी तिच्या इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्टमुळे चर्चेत आली आहे. उर्वशीने नो मेकअप लूकमध्ये एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमुळे सोशल मीडिया यूजर्स रिषभ पंतबद्दल बोलताना अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. 

इन्स्टाग्रामवर अनेकदा तिचे बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करणाऱ्या उर्वशीने एक अतिशय साधा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्वशी मेकअपशिवाय दिसत आहे. फोटो पाहून असे वाटते की हा फोटो चित्रपटाच्या सेटवरचा किंवा अॅड  शूटचा असावा. 

उर्वशी रौतेलाची पोस्ट 
हा फोटो शेअर करताना उर्वशीने कॅप्शनमध्ये लिहिले,  'मौत से पहले भी एक और मौत होती है, देखो जरा अपनी मोहब्बत से दूर होकर।' यानंतर उर्वशीचा फोटोचीच नाही तर कॅप्शनचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. उर्वशीच्या पोस्टवर ट्रोल्स रिषभ पंतचे नाव घेऊन वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काही नेटकऱ्यांनी लिहिले आहे –  रिषभ कमेंट कर. त्याचबरोबर अनेक सोशल मीडिया यूजर्स उर्वशीचे कौतुक करताना दिसत आहेत.

Web Title: After reading Urvashi Rautela's post trollers remembered Rishabh Pant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.