स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात झाल्यानंतर करिश्मा कपूरने खारमधील फ्लॅट विकला इतक्या कोटींना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 12:43 IST2021-01-16T12:42:55+5:302021-01-16T12:43:36+5:30
करिश्मा कपूरने खारमधील दहाव्या मजल्यावरील अपार्टमेंट विकले आहे.

स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात झाल्यानंतर करिश्मा कपूरने खारमधील फ्लॅट विकला इतक्या कोटींना
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिची आई बबिता कपूरने मुंबईतील खार येथील आपले अपार्टमेंट १०.११ कोटी रुपयांना विकले आहे. घर विक्रीनंतर करिश्मा कपूरचा त्या सेलिब्रिटी आणि उद्योगपतींमध्ये समावेश झालाय, जे स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात झाल्यानंतर घर विकून फायदा घेत आहेत.
करिश्मा कपूरने खारमधील दहाव्या मजल्यावरील अपार्टमेंट विकले. झॅपकी डॉट कॉमने मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, करिश्माने विक्रीचा हा व्यवहार करताना २०.२२ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली.
खार पश्चिमेला रोझ क्वीन येथे हे अपार्टमेंट आहे. कार पार्किंगच्या दोन जागा आहेत. आभा दमानी नावाच्या व्यक्तीने हे अपार्टमेंट विकत घेतले आहे. मुंबईच्या पॉश वांद्रे भागामध्ये हे अपार्टमेंट आहे. करिश्मा रहात असलेल्या फ्लॅटचा सध्या प्रति चौरस मीटरसाठी ५५ हजार रुपये असा दर आहे.
महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेट सेक्टरमध्ये थोडी तेजी आणण्यासाठी नुकतेच स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात करण्यात आले होते. ज्याचा परिणाम आता पहायला मिळतो आहे. या संधीचा फायदा घेत बरेच सेलिब्रेटी आपल्या प्रॉपर्टी विकताना दिसत आहेत.
करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर करिश्मा कपूरने काही दिवसांपूर्वी डिजिटल माध्यमात पदार्पण केले आहे. ती एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीच्या वेबसीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजचे नाव होते मेंटलहूड. या सीरिजमधील करिश्माच्या कामाचे खूप कौतूक झाले होते. तसेच तिचा अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज झाला होता. याशिवाय ती करण जोहरचा महत्त्वकांक्षी चित्रपट तख्तमध्ये काम करताना दिसणार आहे.