"आम्ही हे खपवून घेणार नाही!" सलमाननंतर गायिका नेहा कक्करला मिळाली धमकी! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:26 AM2024-10-17T10:26:27+5:302024-10-17T10:27:30+5:30

लोकप्रिय गायिका नेहा कक्करला एका संघटनेकडून मोठा इशारा मिळालाय. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? (neha kakkar)

After Salman khan singer Neha Kakkar received a threat what exactly happened? | "आम्ही हे खपवून घेणार नाही!" सलमाननंतर गायिका नेहा कक्करला मिळाली धमकी! नेमकं काय घडलं?

"आम्ही हे खपवून घेणार नाही!" सलमाननंतर गायिका नेहा कक्करला मिळाली धमकी! नेमकं काय घडलं?

सध्या बॉलिवूडमध्ये घबराटीचं वातावरण आहे. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि त्याला बिष्णोई गँगकडून मिळालेली धमकी हे प्रकरण ताजं असतानाच आणखी एका गायिकेला एका संघटनेकडून इशारा मिळाला आहे. ही गायिका म्हणजे नेहा कक्कर. नेहा आणि तिच्या पतीला एका संघटनेकडून धमकीवजा इशारा मिळाल्याने पुन्हा एकदा सर्वांना धक्का बसला आहे. काय घडलंय नेमकं? जाणून घ्या सविस्तर

नेहा कक्करला मिळाला मोठा इशारा

बाबा बुड्ढा दल संघटनेचे नेते निहंग मान सिंह अकाली यांनी नेहा कक्करला धमकी दिलीय. "तुझ्या पतीला पडद्याआडच ठेव. लोकांसमोर आपत्तीजनक हावभाव आम्ही खपवून घेणार नाही", असा इशारा नेहाला देण्यात आलाय. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत विहंग मान म्हणाले की, "आता नेहा कक्करची बारी आहे. स्वतःच्या पतीला पडद्याआडच ठेवावं असा संदेश नेहापर्यंत पोहचवावा. तुम्ही काय करताय, याची थोडीशी लाज वाटू द्या. तुम्ही खूप चांगले गायक आहात याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी चांगलं काम आणि विचार समोर आणा. आपण आपल्या मुलांना काय देत आहोत."

 


 विंहग मान पुढे म्हणाले की, "सध्या पंजाबमध्ये नशा आणि अभद्र गोष्टींचा पूर आलाय.  अभद्र गोष्टी पसरवण्यामध्ये आमचेच सरदार बांधव आहेत. पण हे खरेखुरे सरदार नाहीत. ज्यांना पूर्वजांपासून सरदारकी मिळाली आहे, त्यांना त्याची इज्जत आहे. खूप लोक आमच्या रडारवर आहेत. जे सोशल मीडियावर चुकीचा कंटेंट पोस्ट करतात त्यांच्यावर आमची नजर आहे. सर्वांना आम्ही एकदा प्रेमाने समजावलं पण दुसऱ्यांदा मात्र चांगलाच धडा मिळेल. आम्हाला अटक झाली तरी चालेल पण कोणालाही समाजात घाण पसरवू देणार नाही." या धमकीमुळे गायिका नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग कोणतं पाऊल उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: After Salman khan singer Neha Kakkar received a threat what exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.