"सूर्यासारखी तेजस्वी व्यक्ती पुढच्या पिढीला कळण्यासाठी..."; 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून डॉ. सलील कुलकर्णींची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 03:35 PM2024-03-26T15:35:59+5:302024-03-26T15:37:28+5:30

'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून डॉ. सलील कुलकर्णींनी लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. काय म्हणाले, सलील कुलकर्णी बघा.

after Seeing Swatantryaveer Savarkar Dr. Saleel Kulkarni's post in viral for randeep hooda | "सूर्यासारखी तेजस्वी व्यक्ती पुढच्या पिढीला कळण्यासाठी..."; 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून डॉ. सलील कुलकर्णींची पोस्ट चर्चेत

"सूर्यासारखी तेजस्वी व्यक्ती पुढच्या पिढीला कळण्यासाठी..."; 'स्वातंत्र्यवीर सावरकर' पाहून डॉ. सलील कुलकर्णींची पोस्ट चर्चेत

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय गायक - संगीतकार आणि दिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णींनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहून खास पोस्ट लिहीली आहे. सलील कुलकर्णी लिहीतात,  "तुजसाठी मरण ते जनन. तुजवीण जनन ते मरण .. हे म्हणणारे आणि ते जगण्यात आचरणारे .. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर .. ह्यांच्यावरचा हा चित्रपट तुम्ही बघाच .. तुमच्या मुलांनाही दाखवा .. !!"

सलील कुलकर्णी पुढे लिहीतात,  "एक महाकवी , एक प्रखर बुद्धिमत्ता असणारे नाटककार .. आणि स्वतःच्या घरावर निखारे ठेवणारे एक क्रांतिकारक .. विनायक दामोदर सावरकर .. अशा व्यक्तीवर प्रत्येक पिढीने कलाकृती करावी आणि पुढच्या पिढीला दाखवावी आणि तरीही संपूर्णपणे आपल्याला मांडता येणार नाही अशी ही सूर्यासारखी तेजस्वी व्यक्ती .. आज चित्रपट पाहताना, पुन्हा पुन्हा जाणवलं कि पुढच्या पिढीला सावरकर कळण्यासाठी पुस्तकं , नाटक , चित्रपट अश्या जेवढ्या माध्यमातून त्यांचे विचार आणि साहित्य मांडता येईल तेवढे मांडायला हवे . आपल्या देशांत जे महाकवी होऊन गेले त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर ह्यात कोणत्याही मराठी भाषा कळणाऱ्या माणसाला शंका असणार नाही ."



सलील कुलकर्णी शेवटी लिहीतात, "सावरकरांसारख्या व्यक्तीवर चित्रपट करण्याचं शिवधनुष्य पेलण्याचा रणदीप हुड्डा ह्यांनी जीव तोडून केलेला प्रयत्न प्रत्येक फ्रेम मध्ये दिसतो .. एवढे पैलू असलेली ही व्यक्ती मांडणं हे अतिशय अवघड काम आहे .. आणि मला वाटतं काही कलाकृती समीक्षे पलीकडच्या असतात .. त्यातली ही एक .. !! ती अनुभवावी .. !! मुलांना दाखवावी .. आपण रोज वापरतो त्यातले चित्रपट , दिग्दर्शक , संपादक असे अनेक मराठी शब्द कोणी निर्माण केले .. ? कोणी आपल्या ऐन तारुण्यातली अनेक वर्ष तुरुंगात काढली ? अशी व्यक्ती .. त्यांचं जीवन आपण पुन्हा पुन्हा स्मरायला हवं ."

Web Title: after Seeing Swatantryaveer Savarkar Dr. Saleel Kulkarni's post in viral for randeep hooda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.