अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंतर तब्बूचा सेटवर झाला अपघात, अॅक्शन सीन शूट करताना झाली दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 11:52 AM2022-08-11T11:52:37+5:302022-08-11T11:57:51+5:30
अभिनेत्री शिल्पा शेट्टी अॅक्शन सीन शूट करताना पाय फ्रॅक्चर झाला आहे तिला ६ आठवडे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता तब्बूचादेखील शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे.
Tabu Injured At Bhola Set: अलीकडेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी शूटिंग दरम्यान अपघात झाला. अॅक्शन सीन शूट करताना शिल्पाच्या पाय फ्रॅक्चर झाला आहे. तिला ६ आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्रीला शूटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. अभिनेत्री तब्बू सध्या तिच्या आगामी 'भोला' चित्रपटात व्यस्त आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असणार आहे, ज्याचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरु आहे. दरम्यान, सेटवरून तब्बूसोबत अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
अजय देवगणच्या ‘भोला’ या अॅक्शन चित्रपटात तब्बू एक निर्भीड आणि उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात स्टंट करताना अभिनेत्री थोडक्यात बाचवली आहे. या चित्रपट तब्बू अजय देवगणसोबत अनेक स्टंट करताना दिसणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार
हा अपघात एका अॅक्शन सीनचे शूटिंग करताना घडला. जेव्हा ट्रक आणि मोटारसायकलची टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की तब्बूच्या उजव्या डोळ्याच्यावर काच लागली. त्याचवेळी, सेटवर उपलब्ध असलेल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दुखापत फार खोल नव्हती, त्यामुळे टाके घालण्याची गरज नव्हती.
अजय देवगणने दिला विश्रांती घेण्याचा सल्ला
सेटवरील या घटनेनंतर अजय देवगणने तब्बूला आराम करण्यास सांगितले आहे. तिला पूर्णपणे बरी होईपर्यंत शूटिंगमधून ब्रेक घ्या असे सांगितले आहे.
अजय देवगण(Ajay Devgan) आणि तब्बू(Tabu) व्यतिरिक्त 'भोला'(Bhola)मध्ये दीपक डोबरियाल, शरद केळकर आणि संजय मिश्रा हे कलाकारही दिसणार आहेत. अजय देवगण या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.