सिद्धू मुसेवालानंतर आणखी एका गायकावर जीवघेणा हल्ला, हनी सिंग सांगितली लेटेस्ट हेल्थ अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 14:06 IST2022-10-03T12:19:34+5:302022-10-03T14:06:04+5:30
पंजाबी गायक 'सिद्धू मुसेवाला'च्या हत्येची घटना ताजी असतानाच आणखी एका गायकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

सिद्धू मुसेवालानंतर आणखी एका गायकावर जीवघेणा हल्ला, हनी सिंग सांगितली लेटेस्ट हेल्थ अपडेट
Punjabi Singer Alfaaz Attacked : पंजाबी गायक 'सिद्धू मुसेवाला'च्या हत्येची घटना पंजाबमधील घटना ताजी असतानाच आणखी एका गायकावर प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने संपूर्ण पंजाबी इंडस्ट्री हादरली आहे. अल्फाज असे या गायकाचे नाव आहे. तसेच बॉलिवूड गायक आणि रॅपर हनी सिंगने गायक अल्फाजचा फोटो शेअर करत ही माहिती दिली. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत हनी सिंगने अल्फाजच्या हल्लेखोरांचा शोधण्याचे आवाहन केलं आहे.
हनी सिंगने शेअर केली पोस्ट
हनी सिंगने सोशल मीडियावर फोटो शेअर करताना एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. अल्फाजला बघायला हॉस्पिटलमध्ये आलाय. त्याच्या प्रकृती अजूनही नाजूक आहे. त्यासा आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय. त्याच्यासाठी प्रार्थना करा.
प्रसिद्ध पंजाबी गायक अल्फाज
अल्फाज एक प्रसिद्ध पंजाबी गायक आहे. याशिवाय तो अभिनेता, मॉडेल, लेखकही आहे. पंजाबी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी अल्फाज लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. या बातमीने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अल्फाजचा जन्म चंदीगडमध्ये झाला असून त्याचे खरे नाव अनजोत सिंग पन्नू आहे. तिने 2011 मध्ये 'ही मेरा दिल' या पंजाबी गाण्याने गायनात पदार्पण केले.याशिवाय त्याने बॉलिवूडमध्ये बर्थडे बॅश हे गाणे गायले आहे. त्याने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.
अलफाजच्या आधी प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची यावर्षी पंजाबमध्ये 29 मे 2022 रोजी हत्या झाली होती. या घटनेने पंजाब म्युझिक इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडानंतरची ही दुसरी घटना आहे.