सावळ्या रंगामुळे सुहाना खान ट्रोल झाल्यानंतर गौरी खाननेही शेअर केली पोस्ट, म्हणाली.....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 01:56 PM2020-10-01T13:56:34+5:302020-10-01T14:00:58+5:30

सुहानाने नुकताच इन्स्टावर एक फोटो शेअर केला होता. तिने हा फोटो शेअर केला आणि युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. तिच्या रंगावरून तिची खिल्ली उडवली गेली.

After Suhana Khan's 'end colourism' post, Gauri Khan shares a note on women empowerment | सावळ्या रंगामुळे सुहाना खान ट्रोल झाल्यानंतर गौरी खाननेही शेअर केली पोस्ट, म्हणाली.....

सावळ्या रंगामुळे सुहाना खान ट्रोल झाल्यानंतर गौरी खाननेही शेअर केली पोस्ट, म्हणाली.....

googlenewsNext

गो-या रंगाविषयी भारतीयाना नेहमीच आकर्षण वाटते. सौदर्य म्हणजे जणु काही गोरा रंगच असा सर्वसामान्य समज. गो-या रंगाला नेहमीच वाहवा मिळत असताना सावळ्या रंगाच्या लोकांमध्ये कधी त्यांच्या रंगामुळे आपण कमी असल्याची भावना निर्माण होते. किंगखान शाहरूख खानची लेक सुहाना खान त्यापैकीच एक. यापूर्वी सुहाना अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी ट्रोल झालीय. पण गप्प बसणा-यांपैकी ती सुद्धा नाही. आता रंगावरून खिल्ली उडवणा-या हेटर्सला तिने खरमरीत उत्तर दिले आहे.

सुहानाने नुकताच इन्स्टावर एक फोटो शेअर केला होता. तिने हा फोटो शेअर केला आणि युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. तिच्या रंगावरून तिची खिल्ली उडवली गेली. या खिल्ली उडवणा-यांना सुहानाने जाम फैलावर घेतले. एक भलीमोठी पोस्ट लिहून तिने आपला संताप व्यक्त केला. हो मी रंगाने सावळी आहे, माझी उंची 5 फूट 3 इंच आहे, पण मी जशी आहे, त्यात आनंदी आहे, असे तिने ट्रोलर्सला सुनावले.

त्याचपाठोपठ सुहानाची आई गौरी खाननेही स्त्री-स्वातंत्र्य आणि सबलीकरण याविषयीची रोखठोक मतं मांडली आहेत.नेहमीच गौरी खान सोशल मीडियावर आपले परखड विचार आणि मत मांडत असते. वर्णभेदाच्या मुद्द्यावर गौरीनेही आपले रोखठोक मत मांडले आहे. भलीमोठी पोस्ट शेअर करत तिने डिजाइनर मोनीषा जयसिंह, कोरियोग्राफर फराह खान, अभिनेत्री अनन्या पांडे आई भावना पांडे, अभिनेत्री नीलम कोठारी आणि संजय कपूरची पत्नी माहिप कपूर यांनाही टॅग केले आहे. 

काय म्हणाली सुहाना... 

सध्या आजुबाजूला ब-याच गोष्टी घडत आहे आणि यापैकीच एका गोष्टीवर व्यक्त होण्याची वेळ आलीये. हा मुद्दा फक्त माझ्या एकटीला लागू होत नाही तर माझ्यासारख्या अनेक मुला-मुलींबाबत हे घडतेय. कोणत्याही कारणाशिवाय त्यांना टीका सहन करावी लागते. माझ्या दिसण्यावर अनेक कमेंट्स केल्या गेल्यात. 12 वर्षांची असताना तुला रंग सावळा आहे म्हणून तू कुरूप दिसतेस, असे मला म्हटले गेले. विशेष म्हणजे, वयाने प्रौढ म्हटल्या जात असलेल्यांनी मला हे सांगितले. आता काय सांगणार?

Also Read: मग तुझा बाबा फेअरनेस क्रिमची जाहिरात का करतो? लोकांनी सुहाना खानला पुन्हा केले ट्रोल

Web Title: After Suhana Khan's 'end colourism' post, Gauri Khan shares a note on women empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.