'तान्हाजी' ब्लॉकबस्टर झाल्यानंतर कार्तिक आर्यनने घेतला संधीचा फायदा, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 18:01 IST2020-02-04T18:00:00+5:302020-02-04T18:01:52+5:30
कार्तिकने आणखीन एक मोठा सिनेमा साईन केला आहे.

'तान्हाजी' ब्लॉकबस्टर झाल्यानंतर कार्तिक आर्यनने घेतला संधीचा फायदा, जाणून घ्या याबद्दल
बॉलिवूडचा हॅण्डसम हंक अभिनेता कार्तिक आर्यन सध्या यशाच्या शिखरावर आहे. २०१८ साली कार्तिकने लुका छुपी, पती पत्नी और वो यासारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या कार्तिक लव्ह आज कलच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यादरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकने आणखीन एक मोठा सिनेमा साईन केला आहे.
बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार, अजय देवगण अभिनीत तान्हाजी -द अनसंग वॉरियर चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतचा आगामी सिनेमा कार्तिकने साईन केला आहे. याबद्दल पिंकव्हिला या वेबसाईटने रिपोर्टच्या माध्यमातून खुलासा केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार कार्तिकचा हा सिनेमा अॅक्शन ड्रामा असणार आहे. पहिल्यांदाच कार्तिक आर्यन रोमँटिक व चॉकलेटी हिरोच्या भूमिकेतून बाहेर पडल अॅक्शन चित्रपटात नशीब आजमावताना दिसणार आहे.
कार्तिकने मुलाखतीत त्याला अॅक्शन चित्रपटात काम करायचे असल्याचे सांगितले आहे. मात्र मागील चित्रपटांचे यश पाहता त्याला जास्त कॉमेडी व रोमँटिक कॉमेडी चित्रपटांच्या जास्त ऑफर्स येत आहेत.
याव्यतिरिक्त कार्तिक आर्यन भूल भुलैया २मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.