'द काश्मीर फाइल्स'च्या यशानंतर विवेक अग्नीहोत्रीची नव्या सिनेमाची घोषणा, जाणून घ्या टायटल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:36 PM2022-04-15T12:36:32+5:302022-04-15T12:42:01+5:30
दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. काश्मीर फाइल्सच्या रेकॉर्डतोड कमाईनंतर प्रेक्षकांचं त्यांच्या आगामी प्रोजेक्टकडे लक्ष लागलं होतं.
'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files)च्या दमदार यशानंतर आणि मोठ्या वादानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. काश्मीर फाइल्सच्या रेकॉर्डतोड कमाईनंतर प्रेक्षकांचं त्यांच्या आगामी प्रोजेक्टकडे लक्ष लागलं होतं. यात काश्मीरी पंडितांवरील अत्याचाराची कहाणी सांगण्यात आली होती. कमी बजेटच्या या सिनेमा कमाईचे अनेक रेकॉर्ड्स तोडले होते. आता विवेक अग्नीहोत्री यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.
द काश्मीर फाइल्सनंतर विवेक रंजन अग्नीहोत्री आता 'द दिल्ली फाइल्स' (The Delhi Files) सिनेमा बनवतील. विवेक रंजन अग्नीहोत्री यांनी ट्विट करत आपल्या नव्या सिनेमाच्या टायटलची घोषणा केली.
I thank all the people who owned #TheKashmirFiles. For last 4 yrs we worked very hard with utmost honesty & sincerity. I may have spammed your TL but it’s important to make people aware of the GENOCIDE & injustice done to Kashmiri Hindus.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 15, 2022
It’s time for me to work on a new film. pic.twitter.com/ruSdnzRRmP
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 15, 2022
काश्मीर फाइल्समध्ये त्यांनी काश्मीरी पंडितांचं दु:खं मांडलं होतं. आता दिल्ली फाइल्समध्ये ते काय दाखवणार? सिनेमात कोण असणार? सिनेमा रिलीज कधी होणार? असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात तयार होऊ लागले आहेत. पण त्याबाबत त्यांनी सध्याच काही खुलासा केला नाही. केवळ टायटलची घोषणा केली.
'द काश्मीर फाइल्स' या सिनेमावरून चांगलाच वाद पेटला होता. प्रेक्षकांमध्ये दोन वर्ग बघायला मिळाले होते. हा सिनेमा सरकारचा प्रपोगंडा असल्याचीही टिका झाली होती. त्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सिनेमा लोकांनी बघायला हवा असं आवाहन केलं होतं. त्यामुळे आता विवेक अग्नीहोत्री यांच्या आगामी सिनेमात काय असेल हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.