पहलगाम हल्ल्यानंतर या पाकिस्तानी अभिनेत्याला बॉलिवूड अभिनेत्रीकडून सपोर्ट, म्हणाली- "सरकारने मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:45 IST2025-04-24T13:45:14+5:302025-04-24T13:45:45+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीने पाकिस्तान अभिनेत्याला सपोर्ट केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानी अभिनेत्याच्या समर्थनार्थ काय म्हणाली अभिनेत्री?

पहलगाम हल्ल्यानंतर या पाकिस्तानी अभिनेत्याला बॉलिवूड अभिनेत्रीकडून सपोर्ट, म्हणाली- "सरकारने मला..."
पहलगाम हल्ल्यानंतर (pahalgam attack) बॉलिवूडमधून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एका अभिनेत्याच्या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. हा अभिनेता म्हणजे फवाद खान.फवाद खानची (fawad khan) प्रमुख भूमिका असलेल्या अबीर गुलाल सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर या सिनेमावर बंदीची मागणी करण्यात येत आहे. अशातच एका बॉलिवूड अभिनेत्रीने सिनेमाला समर्थन देणारी पोस्ट शेअर करुन काय लिहिलंय बघा.
अभिनेत्रीची खास पोस्ट चर्चेत
टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रिद्धी डोगराने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक भावनिक आणि ठाम प्रतिक्रिया नोंदवली आहे. रिद्धीने x वर लिहिलंय की, “माझ्या मते, आता वेळ आली आहे की, सच्चे मुसलमान पुढे यावेत आणि या राक्षसी प्रवृत्तींचा निषेध करून त्यांना समाजातून बाहेर फेकावं! अशा लोकांशी आणि अशा ठिकाणांशी नातं तोडा जे वरवर शांत राहतात पण त्यांचे संबंध दुसरीकडे असतात. कारण वारंवार दहशतवाद एकाच ठिकाणाहून पसरतोय. ते मानवतेचा नाश करत आहेत. ते मनातील आस्थेचा नाश करत आहेत.”
— Ridhi Dogra (@iRidhiDogra) April 23, 2025
फवादसोबत काम करण्याविषयी रिद्धी काय म्हणाली?
“काश्मीरची चांगली प्रगती होत होती. सरकारने यासाठी खूप काही केलं. काश्मीरमध्ये चांगला व्यवसाय निर्माण व्हावा म्हणून अनेक योजना राबवल्या. पण आपण सर्वजण जाणतो की, काही व्यक्ती हे होऊ देत नाहीये. ही माझी वैयक्तिक भावना आहे, पण आता वेळ आली आहे की मानवतेच्या नावाखाली राक्षसांबद्दल दया दाखवणं थांबवावं. भारतासाठी उभं राहा.” रिद्धीने हे मत व्यक्त केल्यावर अनेकांनी तिच्या आगामी 'अबीर गुलाल' सिनेमाबद्दल आणि फवाद खानबद्दल ताशेरे ओढले. त्याविषयी रिद्धी म्हणाली की, "मी हे काम तेव्हा केलं जेव्हा माझ्या सरकारने त्याला परवानगी दिली होती. आणि मी कायदे व नियमांचे पालन करणारी व्यक्ती आहे."