'द आर्चीज'च्या रिलीजनंतर अगस्त्य नंदाच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट, सिनेमात साकारणार आर्मी ऑफिसरची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:53 AM2023-12-15T11:53:36+5:302023-12-15T11:56:08+5:30
Agastya Nanda : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा याने अलीकडेच मेघना गुलजार दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू आणि श्वेता बच्चन(Shweta Bachchan)चा मुलगा अगस्त्य नंदा (Agastya Nanda) याने अलीकडेच मेघना गुलजार दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटातील अगस्त्यच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आता असे वृत्त समोर येत आहे की, 'द आर्चिज' रिलीज होताच अगस्त्य नंदा याच्या हाती मोठा प्रोजेक्ट लागला आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आता त्याच्या दुसऱ्या चित्रपटाच्या तयारीसाठी सज्ज झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,अगस्त्य श्रीराम राघवन यांच्यासोबत 'इक्किस' चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १९७१च्या युद्धातील नायक अरुण खेतरपाल यांचा बायोपिक असल्याचे सांगितले जात आहे आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील यात मुख्य भूमिकेत असणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, अगस्त्य सध्या स्क्रिप्ट वाचत आहे आणि पुढील महिन्यापासून म्हणजेच जानेवारी २०२४ पासून त्याचा पुढचा चित्रपट 'इक्किस'ची शूटिंग सुरू करणार आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या सहामाहीत अगस्त्य स्क्रिप्ट वाचेल आणि पुढील वेळापत्रकासाठी रिहर्सल करण्यासाठी काही कार्यशाळा देखील करेल. श्रीराम यांना अरुण खेत्रपालची भूमिका करण्यासाठी एका तरुण अभिनेता हवा होता आणि त्यांना वाटले की अगस्त्य या भूमिकेसाठी योग्य आहे. अनेक महिन्यांच्या तयारीनंतर श्रीराम आणि अगस्त्य आता शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अगस्त्यने अद्याप त्याच्या दुसऱ्या चित्रपटाबाबत कोणतेही अधिकृत घोषणा केली नाही.
'द आर्चिज'मधून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण
अगस्त्य नंदाने अलीकडेच झोया अख्तरच्या 'द आर्चिज'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर यांनीही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय मिहिर आहुजा, वेदांग रैना, डॉट आणि युवराज मेंडा यांनीही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.