'स्त्री 2' च्या यशानंतर श्रद्धा कपूर नवीन घरात शिफ्ट होणार, अक्षय कुमारच्या शेजारीच घेतला फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:00 PM2024-08-28T12:00:16+5:302024-08-28T12:02:12+5:30

श्रद्धा कपूर हृतिक रोशन राहत असलेल्या जुहू येथील घर भाड्याने घेत आहे.

After the success of Stree 2 Shraddha Kapoor will shift to a new house took a flat on rent next to Akshay Kumar | 'स्त्री 2' च्या यशानंतर श्रद्धा कपूर नवीन घरात शिफ्ट होणार, अक्षय कुमारच्या शेजारीच घेतला फ्लॅट

'स्त्री 2' च्या यशानंतर श्रद्धा कपूर नवीन घरात शिफ्ट होणार, अक्षय कुमारच्या शेजारीच घेतला फ्लॅट

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या 'स्त्री 2' चं यश एन्जॉय करत आहे.  सिनेमाने एकाच आठवड्यात ३०० कोटी पार ची कमाई केली आहे. सिनेमाला मिळालेलं हे घवघवीत यश पाहून सर्वच कलाकारांचं कौतुक होत आहे. दरम्यान सिनेमाच्या यशानंतर श्रद्धा नवीन घरात शिफ्ट होत असल्याची माहिती समोर आली आहे. खिलाडी अक्षय कुमारची ती शेजारी असणार आहे. अक्षयनेही 'स्त्री 2' मध्ये कॅमिओ केला होता. आता दोघंही एकमेकांचे शेजारी होणार आहेत.

'हिंदुस्तान टाइम्स' च्या रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर हृतिक रोशन राहत असलेल्या जुहू येथील घर भाड्याने घेत आहे. हा सी फेसिंग फ्लॅट आहे. आधी वरुण धवन पत्नी नताशासोबत या घरात शिफ्ट होणार होता. मात्र ही डील पुढे झाली नाही. ज्या इमारतीत हृतिकचा हा फ्लॅट आहे त्याच इमारतीत अक्षयही लक्झरी ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतो. या फ्लॅटचं भाडं तब्बल 8.5 लाख असणार आहे. 


श्रद्धा कपूर आतापर्यंत आपल्या आईवडिलांसोबत जुहू येथील अपार्टमेंटमध्ये राहत होती. आता ती पहिल्यांदाच एकटी शिफ्ट होणार आहे. काही दिवसांपूर्वी झाकीर खानच्या शोमध्ये तिने आईवडिलांना सोडून दुसऱ्या घरात शिफ्ट व्हावं का असा प्रश्न विचारला होता. त्यावर झाकीरचं उत्तर खूप व्हायरल झालं होतं. 

१५ ऑगस्ट रोजी 'स्त्री 2' रिलीज झाला. राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना यांचीही सिनेमात भूमिका आहे. २०१८ साली आलेल्या 'स्त्री' चा हा सीक्वेल आहे. तसंच 'स्त्री 3' च्या स्क्रीप्टचं काम आता सुरु झालं आहे. 

Web Title: After the success of Stree 2 Shraddha Kapoor will shift to a new house took a flat on rent next to Akshay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.