'ठग्स ऑफ हिंदुस्तान'नंतर आमिर खान बनणार अंतराळवीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 05:54 AM2017-06-13T05:54:51+5:302017-06-13T11:27:06+5:30

आमिर खान यश राज बॅनरच्या ठग्स ऑफ हिंदुस्ताननंतर चित्रपट 'सैल्यूट'मध्ये  दिसणार आहे. या चित्रपटात तो एस्ट्रोनॉटची भूमिका साकारणार आहे. ...

After 'Thugs of Hindustan', Aamir Khan becomes the Astaraavlavi | 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'नंतर आमिर खान बनणार अंतराळवीर

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'नंतर आमिर खान बनणार अंतराळवीर

googlenewsNext
िर खान यश राज बॅनरच्या ठग्स ऑफ हिंदुस्ताननंतर चित्रपट 'सैल्यूट'मध्ये  दिसणार आहे. या चित्रपटात तो एस्ट्रोनॉटची भूमिका साकारणार आहे. भारताचा पहिला अंतराळ वीर राकेश शर्मा यांच्या आयुष्यावर हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. मंगल पांडे-दि राइजिंग या बायोपिकनंतर आमिर खान काम करत असलेला हा दुसरा बायोपिक ठरणार आहे.

आमिर खानच्या दंगल चित्रपट सात महिन्यानंतर ही यशाची नव नवी शिखर गाठताना दिसतोय. नुकताच हा चित्रपट चीनमध्ये रिलीज करण्यात आला. आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई करणार हा चित्रपट ठरला आहे. सध्या आमिर खान ठग्स ऑफ हिंदुस्तान शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो माल्टामध्ये या चित्रपटाचे शूटिंग करतोय. या चित्रपटात आमिर खानसह अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ठग्स ऑफ हिंदुस्तानचे लेखन आणि दिग्दर्शन विजय कृष्णा आर्चाय करत आहेत. तर आदित्य चोप्रा चित्रपटाचे प्रॉडक्शनचे काम बघणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन आमिर खानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ठग्स ऑफ हिंदुस्तान  2018च्या दिवाळीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपटातही आमिरच्या दंगल प्रमाणेच सुपरहिट ठरले अशी आशा व्यक्त केली जातेय. ठग्स ऑफ हिंदुस्ताननंतर आमिर सैल्यूट चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटासंदर्भात आमिरने रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूरची भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  सैल्यूटची निर्मिती आमिर खान, रॉनी  स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर मिळून करणार आहेत. सैल्यूटचे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत. 

Web Title: After 'Thugs of Hindustan', Aamir Khan becomes the Astaraavlavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.