आधी Twitter अनेकांना केले करण जोहरने अनफॉलो, आता बदलला स्वत:चा फोन नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 02:16 PM2020-06-19T14:16:32+5:302020-06-19T14:22:33+5:30
करणने त्याचा पर्सनल नंबर बदलला आहे. याच्या मागचे कारण त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप असावेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला. या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने थेटपणे करण जोहरवर आरोप केले होते. यूजर्सनी करण जोहर, धर्मा प्रोडक्शन,टी- सिरीज आणि भूषण कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. याच दरम्यान अशी माहिती समोर येते आहे की, करण जोहरने आपला नंबर बदलला आहे. करणने त्याचा पर्सनल नंबर बदलला आहे. याच्या मागचे कारण त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप असावेत. सोशल मीडियावर यूजर्स सतत करण जोहरच्या सिनेमाना ‘बॉयकॉट' करण्याची मागणी करत आहेत.
गुरुवारी करण जोहरने अचानक ट्विटरवर अनेकांना अनफॉलो केले. करण जोहर आता फक्त आठ लोकांना ट्विटरवर अकाउंटवर फॉलो करत आहे. या आठ पैकी चारजणांमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अक्षय कुमार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरच्या सोशल मीडियावरचा लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आलेला दिसतोय. करण जोहर व त्याच्या गँगने सुशांत सारख्या अनेकांना बॉलिवूडमध्ये मोठे होऊ दिले नाही असा आरोप केला जातोय.