'पठाण'चा क्लायमेस्क झाला लीक? दीपिका पादुकोणचं आहे व्हिलन?, ट्विटरवर नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 06:35 PM2023-01-11T18:35:55+5:302023-01-11T18:47:43+5:30

'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच दीपिका पादुकोणची इंटरनेटवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

After watching the pathaan trailer twitter users convinced that Deepika Padukone is the main villain in the film | 'पठाण'चा क्लायमेस्क झाला लीक? दीपिका पादुकोणचं आहे व्हिलन?, ट्विटरवर नेटकरी म्हणाले...

'पठाण'चा क्लायमेस्क झाला लीक? दीपिका पादुकोणचं आहे व्हिलन?, ट्विटरवर नेटकरी म्हणाले...

googlenewsNext

'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच दीपिका पादुकोणची इंटरनेटवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. पुन्हा एकदा दीपिका सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आली असून यावेळी ती भगव्या बिकिनीची नाही तर दुसऱ्या कारणामुळे आली आहे. 

खरं तर, मंगळवारी यशराज फिल्म्सच्या 'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, ज्यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसला. 2 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जॉन अब्राहम एका दहशतवाद्याच्या अवतारात दिसला, जो भारतावरील हल्ल्याबद्दल बोलतानाही दिसत होता. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, शाहरुख खान एका सैनिकाच्या भूमिकेत आहे ज्याचे ध्येय जॉनचे स्वप्न धुळीस मिळवण्याचं असते.

याच ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोणही एका सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे आणि शाहरुखला त्याच्या मिशनमध्ये साथ देते. या सिनेमात शाहरुख खान जबरदस्त अ‍ॅक्शनमध्ये दिसत आहे. ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि जॉन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, तर दीपिका पादुकोण देखील एका सीनमध्ये अ‍ॅक्शनमूडमध्ये दिसत आहे. मात्र, ट्रेलरचा हा भाग पाहून लोक इंटरनेटवर असे म्हणताना दिसतात की केवळ जॉन अब्राहमच नाही तर दीपिका पादुकोणही या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे.

दीपिका व्हिलन आहे की नाही?
ट्विटरवर लोक दीपिकाच्या या भूमिकेवर जोरदार चर्चा करताना दिसत आहेत. एका ट्विटर युजरने म्हटले आहे - पठाणचा ट्रेलर पाहता दीपिका ग्रे कॅरेक्टरमध्ये आहे. दुसर्‍याने लिहिले आहे - दीपिका येथे मुख्य खलनायक आहे, जॉन नाही? दीपिका शाहरुख खानला फसवणार? ट्रेलर पाहून मला वाटते की दीपिकाच या चित्रपटाची खरी खलनायक आहे.

मात्र, अनेकांचे म्हणणे आहे की, दीपिकाचे पात्र हे एक रहस्य आहे आणि ती एक निश्चित सरप्राईज पॅकेज असणार आहे. 

Web Title: After watching the pathaan trailer twitter users convinced that Deepika Padukone is the main villain in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.