यामी गौतमसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय पुलकित सम्राट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 15:50 IST2019-02-22T15:00:32+5:302019-02-22T15:50:57+5:30
बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट सध्या सिनेमांपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. आता पुलकित पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे

यामी गौतमसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय पुलकित सम्राट
बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट सध्या सिनेमांपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. सलमान खानची बहीण श्वेता रोहिरासोबत झालेल्या पुलकितच्या घटस्फोटाचे कारण यामी गौतम असल्याचे बोलले गेले असते. आता पुलकित पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार पुलकित सम्राट कृति खरबंदाला डेट करतोय. दोघांना अनेकवेळा स्पॉट करण्यात आले आहे.
पुलकितच्या बर्थडेला सरप्राईज देण्यासाठी कृति चेन्नईला गेली होती. गेल्या काही दिवसांपासून कृति पुलकितचा पर्सनल ट्रेनर समीर हंसारीकडून ट्रेनिंग घेताना दिसतेय. रिपोर्टनुसार दोघे मीडियासमोर एकत्र येण्यास तयार नसतात.
कृति आणि पुलकितची जोडी वीरे की वेडिंग सिनेमात एकत्र दिसले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होत. लवकरच ते अनीस बज्मींच्या पागलपंती सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसाप पागलपंती मल्टीस्टारर सिनेमा आहे यात पुलकित-कृतिसह जॉन अब्राहम, इलियामा डिक्रूज, अर्शद वारसी आणि उर्वशी रौतला यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मनघट आणि अभिषेक पाठव मिळून करतायेत. सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.