​‘पद्मावत’च्या विरोधात भन्साळींच्या आईच्या नावावर ‘लीला की लीला’ चित्रपट बनवणार करणी सेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 06:43 AM2018-01-26T06:43:38+5:302018-01-26T12:13:38+5:30

संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ रिलीज झाला खरा. पण अद्यापही या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद थांबलेला नाही. आता तर करणी ...

Against Padmavat, in the name of Bhansali's mother, Leela Ki Leela will make a film! | ​‘पद्मावत’च्या विरोधात भन्साळींच्या आईच्या नावावर ‘लीला की लीला’ चित्रपट बनवणार करणी सेना!

​‘पद्मावत’च्या विरोधात भन्साळींच्या आईच्या नावावर ‘लीला की लीला’ चित्रपट बनवणार करणी सेना!

googlenewsNext
जय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ रिलीज झाला खरा. पण अद्यापही या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद थांबलेला नाही. आता तर करणी सेनेने भन्साळींचा सूड उगवण्यासाठी एक नवी क्लृप्ती शोधून काढली आहे. होय, भन्साळींच्या ‘पद्मावत’ला विरोध करण्यासाठी करणी सेनेनेही एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तोही भन्साळींच्या आईच्या नावावर. होय, आम्ही भन्साळींची आई लीला यांच्या नावावर चित्रपट बनवणार, असे चित्तोडगड येथे करणी सेनेने जाहिर केले. या चित्रपटाचे नाव ‘लीला की लीला’ असे असेल.



काल गुरूवारी करणी सेनेच्या चित्तोडगड युनिटने भन्साळींच्या आईच्या नावावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली. आम्ही ‘पद्मावत’च्या विरोधात भन्साळींच्या आईच्या नावावर चित्रपट आणू, असे करणी सेनेच्या चित्तोडगड युनिटचे जिल्हा अध्यक्ष गोविंद सिंह खंगरोट यांनी म्हटले. चित्रपटाचे नाव ‘लीला की लीला’ ठेवण्यात आले असून सध्या याच्या कथेवर काम सुरु आहे. वर्षभरात हा चित्रपट बनून पूर्ण होईल, अशी आमची अपेक्षा आहे. या चित्रपटावर भन्साळींना अभिमान असेल, असे उपरोधिकपणे ते म्हणाले. करणी सेनेचा कार्यकर्ता अरविंद व्यास याच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. या चित्रपटानंतर भन्साळींना महिलेचा अपमान काय असतो, ते कळेल, असे अरविंद व्यास म्हणाले.
तुम्हाला माहित असेलच की, संजय लीला भन्साळींच्या आईचे नाव लीला आहे. भन्साळी आपल्या नावासोबत आईचे नावही लावतात.
भन्साळींचा ‘पद्मावत’ हा चित्रपट शूटींगच्या पहिल्या दिवसापासूनच वादात सापडला आहे. प्रदर्शनापूर्वी संपूर्ण देशभर या चित्रपटाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले़ अजूनही हा विरोध मावळलेला नाही़.

ALSO READ : चार राज्यांत ‘पद्मावत’ नाहीच; BookmyShowला धमकी ! उर्वरित देशात ७००० स्क्रीन्सवर चित्रपट रिलीज!

हिंसक आंदोलन आणि तणावादरम्यान  काल देशभरातील चित्रपटगृहांत हा  चित्रपट   काल 25जानेवारीला देशभरातील ७००० स्क्रीन्सवर रिलीज झाला. तथापि करणी सेनेने पुकारलेला देशव्यापी बंद आणि अनेक ठिकाणी आंदोलनाला लागलेले हिंसक वळण बघता, गुजरात,राजस्थान, मध्यप्रदेश व गोव्यातील चित्रपटगृहांच्या मालकांनी हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Against Padmavat, in the name of Bhansali's mother, Leela Ki Leela will make a film!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.