अगस्त्य नंदा अन् सुहाना खान अलिबागला रवाना, अफेअरच्या चर्चांना उधाण; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:45 IST2024-12-27T13:45:03+5:302024-12-27T13:45:39+5:30
दोघंही स्टारकिड्स अनेकदा पार्टीसाठी एकत्र दिसले आहेत.

अगस्त्य नंदा अन् सुहाना खान अलिबागला रवाना, अफेअरच्या चर्चांना उधाण; Video व्हायरल
शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानने(Suhana Khan) 'द आर्चीज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याच सिनेमातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदानेही (Agastya Nanda) बॉलिवूडमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान सुहाना आणि अगस्त्य एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघंही स्टारकिड्स अनेकदा पार्टीसाठी एकत्र दिसले आहेत. आता नुकतंच सुहाना आणि अगस्त्य अलिबागला जातानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
सुहाना खान रुमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदासोबत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अलिबागला रवाना झाले आहेत. शाहरुख खानच्या फार्महाऊसवर न्यू इयर सेलिब्रेशन पार्टी होणार आहे. सुहाना आणि अगस्त्यचा जेट्टीमध्ये बसतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुहाना व्हाईट क्रॉप टॉप, व्हाईट जॅकेट आणि तपकिरी रंगाच्या पँट असा कॅज्युअल लूक केला आहे. तर अगस्त्याने ब्लॅक शर्ट, तपकिरी पँट आणि डोक्यावर टोपी घातली आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले, 'कुछ तो गडबड है', 'यांचं नक्कीच काहीतरी चालू आहे'. सुहाना खान आणि अगस्त्य नंदाची जोडी अनेकांना पसंतही आहे. 'द आर्चीज' मध्येही दोघांची केमिस्ट्री चांगलीच गाजली. आता लवकरच सुहाना शाहरुख खानसोबत 'द किंग' सिनेमात दिसणार आहे. तर अगस्त्य नंदाचा 'इक्कीस' सिनेमा येणार आहे.