Agneepath Scheme :कंगना रणौतने केले मोदी सरकारच्या 'अग्निपथ योजने'चे समर्थन; म्हणाली-इस्रायलकडून

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 07:46 PM2022-06-18T19:46:43+5:302022-06-18T19:47:36+5:30

कंगना रणौत (Kangana Ranaut) समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर उघडपणे व्यक्त होत असते. आता कंगनाने 'अग्निपथ' या योजनेचं समर्थन केलं आहे.

Agneepath scheme kangana ranaut came in favour of central government | Agneepath Scheme :कंगना रणौतने केले मोदी सरकारच्या 'अग्निपथ योजने'चे समर्थन; म्हणाली-इस्रायलकडून

Agneepath Scheme :कंगना रणौतने केले मोदी सरकारच्या 'अग्निपथ योजने'चे समर्थन; म्हणाली-इस्रायलकडून

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर उघडपणे व्यक्त होत असते. त्यामुळे बऱ्याचदा ती तिच्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येते. कंगना अनेकदा सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर व्यक्त होताना दिसते. आता कंगनाने 'अग्निपथ' या योजनेचं समर्थन केलं आहे. देशात होत असलेल्या हिंसाचारावरही तिने आपले मत मांडले आहे. दिशाभूल झालेल्या तरुणांनी ही योजना समजून घेऊन पाठिंबा द्यावा, असे अभिनेत्रीने सांगितले आहे.

कंगनाने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करताना लिहिले की, "इस्रायलसारख्या अनेक देशांनी त्यांच्या सर्व तरुणांसाठी सैन्य प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. या अंतर्गत प्रत्येक तरुणाला काही वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाते आणि शिस्त, राष्ट्रवाद यासारखी जीवनमूल्ये शिकतात. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी या शब्दांचा अर्थ काय हे जाणून घेण्याचाही प्रयत्न करतो. . अग्निपथ योजना ही खूप महत्त्वाची योजना आहे. ड्रग्ज आणि पबजी खेळणाऱ्या मंडळींना योग्य दृष्टी देण्यासाठी अग्निपथ योजना महत्त्वाची ठरणार आहे. 

अभिनेत्रीने लिहिले की, 'अग्निपथ' करिअर बनवणे, रोजगार मिळवणे आणि पैसे कमवणे यापेक्षा अधिक आहे. कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये या योजनेचे उघडपणे समर्थन केले आहे. तिने पुढे लिहिले की, 'जुन्या काळी प्रत्येकजण गुरुकुलात जात असे आणि ही गोष्ट अगदी तशीच आहे. 

काय आहे अग्निपथ योजना?
तरुणांची सैन्यात चार वर्षांसाठी भरती केली जाणार. हे जवान नाही तर अग्नीवीर संबोधले जाणार. या दरम्यान अग्निवीरांना आकर्षक पगार मिळेल. चार वर्षांच्या सैन्य सेवेनंतर तरुणांना भविष्यासाठी अधिक संधी दिली जाणार आहे. सेवा निधी पॅकेज चार वर्षांच्या सेवेनंतर उपलब्ध होईल. या योजनेंतर्गत भरती झालेल्या बहुतांश सैनिकांना चार वर्षांनी मुक्त केले जाईल. मात्र, काही जवान आपली नोकरी सुरू ठेवू शकतील. 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना संधी मिळेल. प्रशिक्षण 10 आठवडे ते 6 महिन्यांचे असेल. या अग्नीवीरसाठी 10/12वीचे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. अग्निवीरांच्या ५० हजार जागा भरण्यात येणार आहेत.
 

Web Title: Agneepath scheme kangana ranaut came in favour of central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.