आहाना कुमारा नसिरुद्दीन शाहला मानते गुरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 02:52 PM2017-09-20T14:52:20+5:302017-09-20T20:54:36+5:30

लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटात झळकलेली आहाना कुमारा ही ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना गुरू मानत असून, त्यांची ...

Ahana Kumara admits to Nasiruddin Shah! | आहाना कुमारा नसिरुद्दीन शाहला मानते गुरू!

आहाना कुमारा नसिरुद्दीन शाहला मानते गुरू!

googlenewsNext
पस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटात झळकलेली आहाना कुमारा ही ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना गुरू मानत असून, त्यांची तिच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे ती सांगते. नसिरुद्दीन शाह यांच्या मार्गदर्शनाखाली एक थिएटर स्टूडेंट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणारी आहाना सध्या ‘द फादर’ या नाटकामध्ये त्यांच्यासोबत काम करीत आहे. आहानाने म्हटले की, नसिरूद्दीन सर यांची माझ्या करिअरमध्ये खूपच महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ते माझे गुरू आहेत. मला जेव्हा-केव्हा अडचण येते तेव्हा मी त्यांच्याकडे जात असते. त्यांच्याकडे माझ्या प्रत्येक शंकेचे निरसन आहे. 

पुढे बोलताना आहानाने म्हटले की, ‘मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत इंडी (द ब्लूबेरी हंट) चित्रपट केला होता. मात्र आता मला पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करायचे आहे. ते खूपच दमदार अभिनेते आहेत. चित्रपटांविषयी आजही त्यांचा उत्साह बघण्यासारखा आहे. मी जेव्हा-जेव्हा त्यांच्यासोबत असते, तेव्हा मला हमखास त्यांच्याकडून काहींना काही शिकायला मिळते. मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा नसिरुद्दीन शाह सरांसोबत झळकण्याचे माझे स्वप्न आहे, असेही आहानाने म्हटले. 



दरम्यान, आहानाने ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटात काम केले होते. चित्रपटातील तिची भूमिका खूपच चर्चेत राहिली होती. या चित्रपटात नसिरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक यादेखील प्रमुख भूमिकेत होत्या. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी न दिल्याने इंडस्ट्रीमध्ये त्याचा कडाडून विरोध करण्यात आला होता. अखेर सेन्सॉर काही सीन्सवर कात्री लावत चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देत परवानगी दिली होती. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर सरासरी कमाई केली. 

Web Title: Ahana Kumara admits to Nasiruddin Shah!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.