हृतिक रोशनविरोधात फसवणुकीचा गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 03:12 PM2019-07-04T15:12:59+5:302019-07-04T15:17:44+5:30
हृतिक रोशन पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. होय, ‘सुपर 30’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या हृतिकविरोधात हैदराबाद पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हृतिक रोशन पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. होय, ‘सुपर 30’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या हृतिकविरोधात हैदराबाद पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी हृतिकविरोधात कलम 402 व 406अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
शेषाद्रीनगरातील कुकटपल्लीची शशीकांत नामक एका व्यक्तिच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. शशीकांत ने डिसेंबर 2018 मध्ये क्लटफिट सेंटर ज्वॉईन केले होते. या जिम सेंटरच्या अनेक शाखा आहेत. हृतिक CULT-FIT Health Care Private Limited या जिम सेंटरचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे.
शशीकांतच्या दाव्यानुसार, हे फिटनेस सेंटर ज्वॉईन करण्यासाठी त्याने 17490 रूपये एकरकमी जमा केले होते. ही डिस्काऊंटेड फी होती. या प्लानमध्ये त्याला वर्षभर अनलिमिटेड वर्कआऊट सेशनची मुभा दिली गेली होती. पण प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही.
एका स्थानिक वृत्तपत्राला शशिकांतने सांगितले की, CULT-FIT या फिटनेस सेंटरमध्ये 1800 लोकांना प्रवेश दिला गेला. मी सुद्धा यातला एक होतो. काही दिवसानंतर गर्दीचे कारण सांगून वर्किंग सेशन टाळले जाऊ लागलेत. सलग तीन दिवस वर्किंग सेशन रद्द केले गेलेत. सोबत येथील लोकांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. हे सगळे आम्हाला दिल्या गेलेल्या उत्तम आरोग्याच्या वचनाविरूद्ध होते. त्यामुळे मी याविरोधात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. शशीकांतने हृतिकशिवाय च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हृतिक सध्या ‘सुपर 30’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वी कंगना राणौतची बहीण रंगोली हिने हृतिकच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. हृतिकची बहीण सुनैना एका मुस्लिम व्यक्तिवर प्रेम करते, यामुळे हृतिकसह त्याच्या कुटुंबाने सुनैनाचा मानसिक व शारीरीक छळ चालवला असल्याचा आरोप रंगोलीने केला होता.