अहिलच्या बर्थडे पार्टीमधील मामू सलमानसोबतचा तो क्युट फोटो पाहिलात का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 20:10 IST2020-03-30T20:01:03+5:302020-03-30T20:10:27+5:30
आयुष शर्मा आणि अर्पिताचा मुलगा आहिलचा चौथा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला.

अहिलच्या बर्थडे पार्टीमधील मामू सलमानसोबतचा तो क्युट फोटो पाहिलात का ?
सध्या सुपरस्टार सलमान खान आपल्या कुटुंबासोबत पनवेलच्या फॉर्महाऊसमध्ये वेळ घालवतो आहे. याच दरम्यान आयुष शर्मा आणि अर्पिताचा मुलगा अहिलचा चौथा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला. मामा सलमान खानसोबत संपूर्ण परिवाराने अहिलचा बर्थ डे फॉर्महाऊसवर सेलिब्रेट केला. बर्थडे सेलिब्रेशनचे काही खास फोटोसमोर आले आहेत.
पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये खान आणि शर्मा कुटुंबीय उपस्थित आहेत. अलवीराचा पती अतुल अग्निहोत्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर अहिलच्या बर्थेडे फोटो शेअर केले आहेत. अहिला आपल्या लाडक्या मामूला अर्थात सलमान खानला फोटोत केक भरवाताना दिसतो आहे.
लॉकडाऊनमध्ये सलमानने ही मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खानची बिईंग ह्युमन ही संस्था आता चित्रपट इंडस्ट्रीशी निगडित असलेल्या २५ हजार लोकांची मदत करणार आहे. सलमान खानने २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले असून तो त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. सलमान खानने इंडस्ट्रीच्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजला फोन करून २५ हजार कामगारांचे बँक डिलेल्स मागवले आहेत.