आधी म्हणाले सुशांतची हत्या, रिपोर्टमध्ये म्हणाले आत्महत्या; एम्सच्या डॉक्टरांची ऑडिओ क्लिप लीक
By रूपाली मुधोळकर | Published: October 5, 2020 03:36 PM2020-10-05T15:36:48+5:302020-10-05T15:38:16+5:30
डॉ. सुधीर गुप्ता यांचीच एक ऑडिओ टेप लीक झाली आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी एम्सच्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने आपला रिपोर्ट अलीकडे सीबीआयकडे सुपूर्त केला आहे. सुशांतची हत्या झाली नाही. तर हे आत्महत्येचे प्रकरण आहे, असे या फॉरेन्सिक टीमने आपल्या अखेरच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहेए एम्सच्या एक्सपर्ट पॅनेलचे हेड डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा गळा दाबून हत्या करण्याच्या संभावलेला धुडकावून लावली आहे. आता डॉ. सुधीर गुप्ता यांचीच एक ऑडिओ टेप लीक झाली आहे. सुशांतने आत्महत्या नाही तर त्याची हत्या झाली आहे, असा दावा डॉ. गुप्ता या ऑडिओ क्लिपमध्ये करत आहेत.
‘टाईम्स नाऊ’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. आपल्या हाती एक ऑडिओ टेप लागल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.
#EXCLUSIVE#BREAKING | TIMES NOW accesses leaked audio admission of Dr. Sudhir Gupta. On tape, Dr. Sudhir Gupta claims 'Sushant Singh was murdered'.
— TIMES NOW (@TimesNow) October 5, 2020
Priyank Tripathi with details. pic.twitter.com/Rr7hf2ihz7
ऑडिओ टेपमध्ये काय म्हणतात डॉ. सुधीर गुप्ता
माझ्याकडे सर्वप्रथम सुशांतचेफोटो आले, तो पाहून तेव्हाच सुशांतची हत्या झाल्याचे मला वाटले होते. ही ऑडिओ टेप सुशांतचा फोटो पाहिल्यानंतरची असल्याचे सांगितले जात आहे. आता मात्र आपल्या रिपोर्टमध्ये डॉ. सुधीर गुप्ता व त्यांच्या टीमने सुशांतची हत्या झालीच नसून हे आत्महत्येचेच प्रकरण असल्याचा दावा केला आहे.
काय म्हणतो एम्सचा रिपोर्ट?
एम्सने सीबीआयला सोपवलेल्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या शरीरावर गळफासशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी जखमा नव्हत्या. तसेच शरीर आणि कपड्यांसोबत कोणताही संघर्ष झालेलाही दिसला नाही बॉम्बे टॉक्सिक सायन्स लॅब तसेच एम्स टॉक्सिकोलोजी लॅबमध्ये सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी पदार्थ आढळले नाही. गळ्यावर असलेला डाग हा गळफासामुळेच होता. यापूर्वी सुशांतचं शवविच्छेदन करणा-या कूपर इस्पितळाच्या पॅनेलने सुशांतचा मृत्यू आत्महत्यनेच झाल्याचं म्हटले होते.
बहीण म्हणाली, प्रार्थना करा
This kind of U-Turn must be explained!! #SushantConspiracyExposed#SushantAIIMSTapehttps://t.co/YnCgfeELTu
— Shweta Singh Kirti (@shwetasinghkirt) October 5, 2020
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सुशांतच्या कुटुंबाने पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे. सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंगने याबाबत ट्वीट केलेआहे. एम्सने असा यूटर्न का घेतला, याबाबत स्पष्टीकरण द्या, अशी मागणी श्वेताने केली आहे.