अतिरिक्त लगेज चार्ज वसूल केल्याने एअर इंडियावर संतापली ‘ही’ अभिनेत्री, ट्विटरवर काढली भडास!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 03:30 PM2018-03-28T15:30:06+5:302018-03-28T21:00:06+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी एअर इंडियावर (एआय) चांगलीच संतापली आहे. बुधवारी तिने एअरलाइन्स कंपनीवर चांगलीच भडास काढली. अदितीने ...

Air India angry with 'extra' luggage charging 'actress', removed on Twitter! | अतिरिक्त लगेज चार्ज वसूल केल्याने एअर इंडियावर संतापली ‘ही’ अभिनेत्री, ट्विटरवर काढली भडास!

अतिरिक्त लगेज चार्ज वसूल केल्याने एअर इंडियावर संतापली ‘ही’ अभिनेत्री, ट्विटरवर काढली भडास!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी एअर इंडियावर (एआय) चांगलीच संतापली आहे. बुधवारी तिने एअरलाइन्स कंपनीवर चांगलीच भडास काढली. अदितीने म्हटले की, जवळपास रिकाम्या फ्लाइटमध्ये एआय स्टाफने तिची बॅग ठेवली नाही. मात्र अन्य प्रवाशांच्या तुलनेत अधिकचे लगेच शुल्क वसूूल केले. अदितीने याबाबतची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिली. याविषयी एआयने म्हटले की, याविषयी आम्ही अदितीबरोबर चर्चा केली आहे. अदितीने मंगळवारी (२७ मार्च) एक ट्विट करून त्यामध्ये लिहिले होते की, ‘हे खूपच लज्जास्पद आहे की, १५ प्रवाशांच्या फ्लाइटला ओव्हरलोडेड म्हटले जाते. त्यामध्ये एक बॅगसुद्धा ठेवू दिली नाही.’

हैदरीने बुधवारी (२८ मार्च) सकाळी पुन्हा दोन ट्विट केले. त्यामध्ये लिहिले की, ‘तुम्ही लोकांनी (एआय स्टाफ) आमच्या सर्व १४ प्रवाशांकडून अतिरिक्त लगेज शुल्क वसूल केले आहे. तसेच आमचे लगेज फ्लाइटमध्ये ठेवले की नाही हेसुद्धा सांगणे तुम्ही महत्त्वाचे समजले नाही. ९आय८०७ कुल्लू ते चंदीगढ (फ्लाइट नंबर-रुट) प्रबंधकाकडून याबाबतची कुठलीही मदत केली गेली नाही.’ दरम्यान, एअर इंडियाने या प्रकरणी उत्तर देताना म्हटले की, ‘तुम्ही तुमच्या फ्लाइटशी संबंधित डिटेल पाठवा. आम्ही याविषयी चौकशी करून त्याबाबतची माहिती तुम्हाला देऊ’.



अदितीने आणखी एक ट्विट करताना त्यामध्ये लिहिले की, ‘माझ्या बोर्डिंग कार्डवरून हे स्पष्ट होते की, आम्हाला कुठेही याविषयी (शुल्क) सूचित केले नाही. आम्ही त्या लोकांपैकी होतो, ज्यांनी रिकाम्या एअरपोर्टवर चेक इन केले. तसेच आमच्या लगेजसाठी अतिरिक्त शुल्कही भरले. ही खरोखरच खूप वाइट बाब आहे.’ एअर इंडियाने याविषयी माहिती देताना म्हटले की, ‘९आय८०७ एअर फ्लाइट ही एक सहायक फ्लाइट असून, ती एअर इंडियाच्या आॅपरेशन्स टीमशी वेगळी आहे. या प्रकरणाशी संबंधित ब्योरा पुढे जात असून, संबंधितांवर उचित कारवाई केली जाईल.’



यावर अदितीने म्हटले की, ‘ही माझीच समस्या नव्हती, तर सर्व प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. लोकांना मदतीची आवश्यकता होती. मी केवळ प्रवाशांना परिस्थितीची जाणीव करून दिली. एअरलाइन्स स्टाफने आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. दरम्यान, एअरलाइन्सकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. 

Web Title: Air India angry with 'extra' luggage charging 'actress', removed on Twitter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.