ऐश्वर्या न्यूयॉर्कमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, पती आणि लेकीसोबतचा नाही तर फॅनसोबतचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 17:05 IST2024-07-31T17:04:34+5:302024-07-31T17:05:21+5:30
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. ती अभिषेक आणि मुलगी आराध्याशिवाय व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचं बोललं जात आहे.

ऐश्वर्या न्यूयॉर्कमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, पती आणि लेकीसोबतचा नाही तर फॅनसोबतचा फोटो व्हायरल
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जाते. मात्र ते दोघे बऱ्याचदा एकत्र येत या चर्चेला पूर्णविराम लावताना दिसतात. दरम्यान ऐश्वर्या सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. ती अभिषेक आणि मुलगी आराध्याशिवाय व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचं बोललं जात आहे.
ऐश्वर्या रायचा हा फोटो न्यूयॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये काढण्यात आला आहे. तिथे काम करणारी मुलगी ऐशची खूप मोठी फॅन आहे. यापूर्वीही ती अभिनेत्रीला भेटली होती आणि आता तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
५० वर्षीय ऐश्वर्या राय बच्चनचा हा फोटो काही वेळातच व्हायरल होऊ लागला. एका चाहत्याने लिहिले, 'देवी. ती बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात महान पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. खूप काही मिळवण्यासाठी ती पात्र आहे!' आणखी एका चाहत्याने कमेंट केली की, 'तिने बॉलिवूडमध्ये पाहिलेले सर्वात मोठे पुनरागमन करावे अशी माझी इच्छा आहे. या वयातही ती देवीसारखी दिसत आहे. ती खूपच सुंदर दिसत असल्याचे बहुतेक चाहते सांगत आहेत.