ऐश्वर्याच्या गाडीला BESTची धडक! रागात बॉडीगार्डने बस ड्रायव्हरच्या कानाखाली मारली अन्...; समोर आला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 09:09 IST2025-03-27T09:07:44+5:302025-03-27T09:09:32+5:30
ऐश्वर्याच्या कारला बेस्टच्या बसने मागून धडक दिली. बुधवारी(२६ मार्च) संध्याकाळी मुंबईतील जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ ही घटना घडली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

ऐश्वर्याच्या गाडीला BESTची धडक! रागात बॉडीगार्डने बस ड्रायव्हरच्या कानाखाली मारली अन्...; समोर आला व्हिडिओ
मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ऐश्वर्याच्या कारला बेस्टच्या बसने मागून धडक दिली. बुधवारी(२६ मार्च) संध्याकाळी मुंबईतील जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ ही घटना घडली. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या रायच्या गाडीच्या मागे धडक दिलेली बेस्ट बस उभी असल्याचं दिसत आहे.
वरिंदर चावला या पापाराझी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाला नाही आणि कोणालाही दुखापत झाली नाही. पण, यानंतर तिथे लोकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेनंतर बच्चन कुटुंबीयांच्या बॉडीगार्डने बस ड्रायव्हरच्या कानाखाली मारल्याचं सांगितलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जुहू बस डेपोतून निघाल्यानंतर सांताक्रूझ स्टेशनला जाणाऱ्या २३१ नंबरच्या बसने ऐश्वर्या राय बच्चनच्या गाडीला मागून धडक दिली. त्यानंतर बस ड्रायव्हरने तातडीने बस थांबवली. तेवढ्यातच बॉडीगार्डने त्याच्या कानाखाली मारल्याचा प्रकार घडला. बस ड्रायव्हरने पोलिसांना कॉल करत हा घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं काम पाहणाऱ्या सुपरव्हायझरने त्या बस ड्रायव्हरची माफी मागितली. त्यानंतर हे प्रकरण मिटलं.