तुम्हाला माहितेय का ऐश्वर्या राय बच्चनचा पहिला हिंदी चित्रपट कोणता? हिट झाला की फ्लॉप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:14 IST2025-02-25T13:14:17+5:302025-02-25T13:14:50+5:30

ऐश्वर्या राय बच्चन पहिला हिंदी चित्रपट कोणता होता? तो हिट झाला की फ्लॉप? याबद्दल जाणून घ्या...

Aishwarya Rai Bachchan First Hindi Film Was Aur Pyaar Ho Gaya Debut Alongside This Villain | तुम्हाला माहितेय का ऐश्वर्या राय बच्चनचा पहिला हिंदी चित्रपट कोणता? हिट झाला की फ्लॉप?

तुम्हाला माहितेय का ऐश्वर्या राय बच्चनचा पहिला हिंदी चित्रपट कोणता? हिट झाला की फ्लॉप?

Aishwarya Rai Bachchan First Hindi Film: विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनचा (Aishwarya Rai Bachchan) जगभरात चाहतावर्ग आहे. ऐश्वर्या फक्त दिसायलाच सुंदर नाही तर अभिनय, अभ्यास यासह विविध भाषांमध्ये निपुण आहे. ऐश्वर्या आपल्या फिल्मी करीअर आणि पर्सनल लाईफमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिली.  ऐश्वर्याने आपल्या अभिनयाची जादू फक्त बॉलिवूडमध्ये दाखवली नसून, हॉलिवूडमध्येही तिचा जलवा पाहायला मिळतो.  तिने आजतागायत अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. पण, तुम्हाला ऐश्वर्या राय बच्चन पहिला हिंदी चित्रपट कोणता होता? तो चित्रपट हिट झाला की फ्लॉप? हे माहितेय का, तर आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर अवघ्या तीन वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.  ऐश्वर्या राय गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीत काम करत आहे. ऐश्वर्याने १९९७ मध्ये 'और प्यार हो गया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 'और प्यार हो गया' हा ऐश्वर्या रायचा पहिला हिंदी चित्रपट होता. या चित्रपटात ऐश्वर्या रायने बॉबी देओलसोबत (Bobby Deol) काम केलं होतं. हा चित्रपट राहुल रवैल यांनी दिग्दर्शित केला होता.  १५ ऑगस्ट १९९७ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बॉबी देओल, ऐश्वर्या राय बच्चन, शम्मी कपूर आणि अनुपम खेर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 


'और प्यार हो गया' चित्रपटाचं बजेट ६.२५ कोटी रुपये होते आणि चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १३.८५ कोटी रुपये कमाई केली, म्हणजेच बजेटच्या दुप्पट गल्ला जमवला होता.  या चित्रपटानंतर ऐश्वर्या '२३ मार्च १९३१: शहीद'मध्ये बॉबीसोबत दिसली होती. हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी भगतसिंगच्या जीवनावर आधारित होता.  दिवंगत दिग्गज पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपटातील गाणी आजही हिट आहेत. यानंतर ऐश्वर्या आणि बॉबीची जोडी मोठ्या पडद्यावर पुन्हा कधीच एकत्र दिसली नाही. बॉबी देओलने त्याच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत जास्त फ्लॉप आणि कमी हिट चित्रपट दिले आहेत, तरऐश्वर्यानं मात्र जास्त हिट चित्रपट आहेत.

Web Title: Aishwarya Rai Bachchan First Hindi Film Was Aur Pyaar Ho Gaya Debut Alongside This Villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.