आईला अवॉर्ड मिळताच धावत गेली आराध्या, पण सोशल मीडियावर मायलेकी झाल्या ट्रोल; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:17 IST2024-09-16T16:16:52+5:302024-09-16T16:17:55+5:30
ऐश्वर्या आणि आराध्याचा दुबईतील अवॉर्ड सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल होतोय

आईला अवॉर्ड मिळताच धावत गेली आराध्या, पण सोशल मीडियावर मायलेकी झाल्या ट्रोल; कारण...
दुबईमध्ये नुकताच दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (SIIMA) सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक दाक्षिणात्य तारे तारका उपस्थित होते. शिवाय काही बॉलिवूड कलाकारही होते. या सर्वांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिच्या लेकीने लक्ष वेधून घेतलं. ऐश्वर्या नेहमी आराध्याला आपल्यासोबत घेऊन जाते. या सोहळ्यासाठीही मायलेकी एकत्र आल्या होत्या. यावेळी ऐश्वर्याला पुरस्कारही मिळाला तेव्हा आराध्याची रिएक्शन काय होती बघा.
ऐश्वर्या राय बच्चनला पोन्नियन सेल्वन:II साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. दिग्दर्शक कबीह सिंहच्या हस्ते तिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार घेतल्यानंतर ऐश्वर्या स्टेजवरुन खाली उतरली तेव्हाच आराध्या धावत आईकडे गेली. आईला अवॉर्ड मिळाल्याचं पाहून आराध्याला खूप अभिमान वाटत होता. ती खाली बसून आधी आईचे फोटोही काढत होती. नंतर तिने ऐश्वर्याला धावत जाऊन मिठी मारली. मायलेकीचा हा गोड कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Our Nandini #AishwaryaRai 's win last night n Aaradhya's Hug Precious ❤️ pic.twitter.com/8YjojE0RoW
— Aishwarya Rai - FC (@FabulousAish) September 16, 2024
दरम्यान ऐश्वर्या आणि आराध्या यांना सोशल मीडियावरट्रोलही केलं जात आहे. याचं कारण म्हणजे त्यांचा फॅशन सेन्स. दोघींनी घातलेले आऊटफिट नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेले नाहीत. 'आधी डिझायनर बदल', 'दोघी नेहमीच एकमेकांना चिकटलेल्या असतात', 'आराध्या शाळेत जात नाही का' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या या दोघीच दुबईला गेल्या होत्या. सध्या अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरुन आहेत.