ऐश्वर्या राय बच्चनचे वाढले नखरे! केले असे काही की,पती अभिषेक बच्चनही झाला नाराज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 05:23 AM2018-02-06T05:23:42+5:302018-02-06T10:53:42+5:30

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे आठ वर्षांपूर्वी ‘मणिरत्नम’ यांच्या ‘रावण’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. आठ वर्षांनंतर पुन्हा ...

Aishwarya Rai Bachchan grew up! Someone did that, Abhishek Bachchan was also angry! | ऐश्वर्या राय बच्चनचे वाढले नखरे! केले असे काही की,पती अभिषेक बच्चनही झाला नाराज!!

ऐश्वर्या राय बच्चनचे वाढले नखरे! केले असे काही की,पती अभिषेक बच्चनही झाला नाराज!!

googlenewsNext
्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे आठ वर्षांपूर्वी ‘मणिरत्नम’ यांच्या ‘रावण’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करण्याचा योग ऐश्वर्या व अभिषेककडे चालून आला होता. होय, शैलेश आर सिंह यांच्या एका चित्रपटात ही जोडी एकत्र दिसणार होती. खरे तर अभिषेकचे नाव या चित्रपटासाठी फार आधीच फायनल झाले होते. पण ऐश्वर्याने यासाठी ना होकार दिला होता, ना नकार. त्यामुळे गत वर्षभरापासून हा चित्रपट रखडला होता. 



अभिषेकला चित्रपटाची कथा आवडली होती. तो कथेबद्दल समाधानी होता. पण ऐशला म्हणे, या कथेत ऐनवेळी काही बदल सुचवले. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटात काम करण्यासाठी भरभक्कम रक्कमही मागितली. जणू माझ्याऐवजी दुसरी कुणी हिरोईनचं बॉलिवूडमध्ये नाही, असा यावेळी ऐश्वर्याचा तोरा होता, म्हणे. साहजिकच इतकी मोठी रक्कम देण्यास निर्मात्यांनी नकार दिला आणि तिकडे ऐश्वर्याने  ‘रात और दिन’च्या रिमेकवर लक्ष केंद्रीत केले. आता ताजी खबर खरी मानाल तर शैलेश आर सिंह आपल्या चित्रपटासाठी ऐश्वर्याऐवजी दुसºया हिरोईनच्याशोधात आहेत. सूत्रांचे मानाल तर. अभिषेक ऐश्वर्यासोबत काम करण्यास बराच उत्साहित होता. पण ऐश्वर्यामुळे अभिषेकला हा चित्रपट हातचा गमवावा लागला. याबद्दल अभिषेकने ऐश्वर्यासमोर आपली नाराजीही बोलून दाखवल्याचे कळते. पण कदाचित ऐश्वर्यावर याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाहीय. कारण, गेल्या काही दिवसांत ऐश्वर्या बरेच नखरे दाखवू लागल्याचे समजतेय. दबक्या आवाजात, तिच्या या नखºयांची चर्चा बी-टाऊनमध्ये होऊ लागलीयं. आता खरे काय नि खोटे काय, हे ऐश्वर्यालाचं ठाऊक़ पण एका मुलीच्या आईला असे नखरे परवडणारे नाहीत, हे ऐश्वर्याने जितक्या लवकरच कळेल, तितके चांगले.

ALSO READ : ऐश्वर्या राय बच्चनने नणंद श्वेता बच्चनमुळे ‘मिस’ केली फराह खानची बर्थ डे पार्टी?

वाढलेल्या नख-यांसोबतच ऐश्वयाचे सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन हिच्यासोबत बिघडलेल्या नात्यांची चर्चा जोरात आहे.  ऐश्वर्याचे सासू व नणंदेसोबतचे संबंध फार चांगले नाहीत, असे अलीकडे ऐकू येतेय. 

Web Title: Aishwarya Rai Bachchan grew up! Someone did that, Abhishek Bachchan was also angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.