मॉडेलिंगच्या दिवसात अशा दिसायच्या बॉलिवूडच्या या बाला, पाहून बसणार नाही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 11:01 AM2020-04-24T11:01:49+5:302020-04-24T11:24:33+5:30
स्टार्सचे मॉडेलिंगच्या दिवसातील फोटो
मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणारे आणि पुढे बॉलिवूडचे स्टार म्हणून नावारूपास आलेले अनेक कलाकार आहेत. सलमान खान, अक्षय कुमार, ऐश्वर्या राय, बिपाशा बासू अशी ही यादी बरीच मोठी आहे. मॉडेलिंगच्या ग्लॅमरस दुनियेत नाव कमवणा-या या सर्वांचा आज बॉलिवूडमध्ये दबदबा आहे. आज याच स्टार्सचे मॉडेलिंगच्या दिवसातील फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
बॉलिवूडची ब्लॅक ब्युटी बिपाशा बासू सध्या बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण हो सोशल मीडियावर मात्र ती आजही अॅक्टिव्ह आहे. मॉडेलिंगच्या काळात बिपाशा वेगळीच दिसायची. आज तिचा लूक बराच बदललाय.
सुश्मिता सेन
सुश्मिता सेन हिनेही आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. 1994 मध्ये सुश्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला तेव्हा तिचे वय केवळ 18 वर्षे होते. यानंतर दोनच वर्षांनी तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
ऐश्वर्या राय
मॉडेलिंगच्या दिवसात ऐश्वर्याचे फोटो पाहून तुम्ही दंग व्हाल. वाढत्या वयासोबत ऐश्वर्या बरीच बदललीय. अधिक सुंदर दिसू लागलीय.
कतरीना कैफ
2003 साली बूम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी कतरीना कैफ आज आघाडीची नायिका म्हणून ओळखली जाते. मल्याळम चित्रपटाद्वारे तिने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. पण त्याआधी ती मॉडेल होती.
पूजा भट
महेश भट यांची लेक पूजा भट हिने 1991 साली दिल है की मानता नहीं या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. पण त्याआधी एक यशस्वी मॉडेल म्हणून ती ओळखली जाऊ लागली होती. मॉडेलिंगच्या काळातील तिचे ग्लॅमरस फोटो बघून तुम्ही थक्क व्हाल.