ऐश्वर्या राय बच्चननं नाकारला संजय लीला भन्साळींचा 'बाजीराव मस्तानी', अखेर कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 07:23 PM2024-03-21T19:23:56+5:302024-03-21T19:24:37+5:30
Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाचा भाग का होऊ शकली नाही हे सांगत आहे.
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील सलमान खान (Salman Khan ) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांची जोडी लोकांना खूप आवडली. यानंतर संजय लीला भन्साळी यांना या जोडीला पुन्हा चित्रपटात कास्ट करायचे होते. पण ही जोडी पुन्हा कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसली नाही. यानंतर ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या रिलेशनशीप संदर्भात अनेक किस्से चर्चेत येऊ लागले. अनेक वर्षांच्या या अटकळानंतर आता ऐश्वर्या रायचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाचा भाग का होऊ शकली नाही हे सांगत आहे.
Reddit वर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय करण जोहरशी बोलताना दिसत आहे. ज्यावरून ती कॉफी विथ करण शोमध्ये मुलाखत देताना दिसत आहे. यामध्ये ती म्हणताना दिसते की, तिला बाजीराव मस्तानीमध्ये मस्तानी चित्रपट करायचा होता पण संजय लीला भन्साळी ज्या कलाकारांसोबत काम करायचे होते त्यांच्यासोबत नाही. यानंतर तिने स्पष्टपणे सांगितले की, संजय लीला भन्साळी यांना बाजीरावला कास्ट करायचे होते. तिला त्याच्यासोबत काम करायचे नव्हते. त्यामुळेच तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. मात्र असे वृत्त समोर आले होते की, ऐश्वर्याने हा चित्रपट सोडला पण याबद्दस तिचे काहीच बोलणे झालेले नव्हते. कारण ती हॉस्पिटलमध्ये दाखल होती.
ब्रेकअपच्या वृत्तानंतर सलमान-ऐश्वर्याने केलं नाही एकत्र काम
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ऐश्वर्या रायच्या चाहत्यांनी असा प्रश्नही विचारला की, त्यावेळी संजय लीला भन्साळी ज्याला कास्ट करायचे होते तो बाजीराव कोण होता? ज्याच्या उत्तरात काही चाहत्यांनी तो सलमान खान असल्याचे उत्तर दिले. काही चाहत्यांनी असेही लिहिले की, जेव्हा ऐश्वर्या रायला सलमान खानसोबत काम करायचे नव्हते तेव्हा संजय लीला भन्साळीला तिला कास्ट करायचे होते. दिल दे चुके सनम दरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. पण नंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि त्यानंतर दोघांनी एकही चित्रपट एकत्र केला नाही.