ऐश्वर्या राय-बच्चन ‘या’ साउथ सुपरस्टारसोबत करणार रोमान्स!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2017 02:32 PM2017-05-27T14:32:54+5:302017-05-27T20:02:54+5:30

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या पुढच्या चित्रपटाची कुठलीही बातमी समोर आली नव्हती. आता आलेल्या ...

Aishwarya Rai-Bachchan will be romance with 'South Superstar' !! | ऐश्वर्या राय-बच्चन ‘या’ साउथ सुपरस्टारसोबत करणार रोमान्स!!

ऐश्वर्या राय-बच्चन ‘या’ साउथ सुपरस्टारसोबत करणार रोमान्स!!

googlenewsNext
दिल है मुश्किल’ या चित्रपटानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या पुढच्या चित्रपटाची कुठलीही बातमी समोर आली नव्हती. आता आलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या एका साउथ सुपरस्टारसोबत लवकरच चित्रपटाला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, ऐश चिरंजिवीसोबत झळकणार आहे. मात्र, आता आलेल्या माहितीनुसार चिरंजिवी या चित्रपटाला प्रोड्यूस करणार असून, त्यांचा मुलगा रामचरण तेजा ऐशच्या अपोझिट असणार आहे. या चित्रपटाला ऐशचे फेव्हरेट दिग्दर्शक मणिरत्नम दिग्दर्शित करणार आहेत. डेक्कन क्रोनिकलच्या रिपोर्टनुसार, ऐशबरोबर या चित्रपटासंबंधी चर्चा सुरू आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदीमध्ये बनविण्यात येणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच ऐशच्या वडिलांचे निधन झाले होते. ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटानंतर ऐशच्या वडिलांची तब्येत खूपच खालावली होती. त्यामुळे ती त्यावेळी खूप चिंतेत राहत होती. मात्र आता ती पुन्हा आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित करू इच्छिते. काही दिवसांपूर्र्वीच ऐस कांसच्या रेड कार्पेटवर बघावयास मिळाली होती. रेड कार्पेटवरील तिचा जलवा बघण्यासारखा होता. तिच्या लुकचे सर्वत्र कौतुकही केले गेले. सध्या ऐश चित्रपटाच्या स्क्रिप्ट फायनल करण्यात व्यस्त आहे. 



‘ऐ दिल हैं मुश्किल’मध्ये रणबीर कपूरबरोबर तिची केमिस्ट्री खूपच चांगली जमली होती. आता पुन्हा एकदा ती रामचरण तेजा याच्यासोबत रोमान्स करताना बघावयास मिळणार असल्याने प्रेक्षकांना ही जोडी कितपत पसंत येईल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या पती अभिषेकबरोबर एक चित्रपट करणार असल्याची माहिती समोर आली होती. ‘गुलाब जामून’चा हा एक आउट एंड आउट कॉमेडी चित्रपट असेल. ज्याची अनुराग कश्यप प्रॉडक्शनअंतर्गत निर्मिती केली जाईल. या चित्रपटाच्या दिग्दर्शनांची धुरा तरुण चेहºयावर सोपविली जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, या चित्रपटाची अभिषेक आणि ऐश या दोघांनाही स्क्रिप्ट पसंत आली असून, दोघांकडून या चित्रपटासाठी होकार देण्यात आला आहे. ऐश्वर्याने मॅटरनिटी ब्रेकनंतर २०१५ मध्ये ‘जज्बा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. मात्र तिच्या ‘ऐ दिल हैं मुश्किल’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता. 

Web Title: Aishwarya Rai-Bachchan will be romance with 'South Superstar' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.