Best and Worst : पाहा, ऐश्वर्या राय बच्चनचे ‘Cannes’च्या रेड कार्पेटवरील आत्तापर्यंतचे लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 06:00 AM2019-05-15T06:00:00+5:302019-05-15T11:55:49+5:30

दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्या राय बच्चन कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार आहे. यंदा ऐश्वर्या कोणत्या लूकमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरेल, हे लवकरच कळेल. पण त्याआधी ऐश्वर्याच्या यापूर्वीच्या लूक्सवर एक नजर टाकुया.

Aishwarya Rai Bachchan’s best and worst looks at Cannes Film Festival | Best and Worst : पाहा, ऐश्वर्या राय बच्चनचे ‘Cannes’च्या रेड कार्पेटवरील आत्तापर्यंतचे लूक!

Best and Worst : पाहा, ऐश्वर्या राय बच्चनचे ‘Cannes’च्या रेड कार्पेटवरील आत्तापर्यंतचे लूक!

googlenewsNext
ठळक मुद्देकान्समधील या लुक्समुळे ऐश्वर्या काहीवेळा अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल झाली तर कधी तिच्या लूक्सची लोकांनी भरभरून प्रशंसा केली.

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावणा-या बॉलिवूड अभिनेत्रींचा लूक कायम चर्चेत असतो. १४ मेपासून रंगणा-या यंदाच्या कान्स महोत्सवाकडे त्यामुळेच भारतीय चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्या राय बच्चन कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार आहे. यंदा ऐश्वर्या कोणत्या लूकमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरेल, हे लवकरच कळेल. पण त्याआधी ऐश्वर्याच्या यापूर्वीच्या लूक्सवर एक नजर टाकुया. कान्समधील या लुक्समुळे ऐश्वर्या काहीवेळा अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल झाली तर कधी तिच्या लूक्सची लोकांनी भरभरून प्रशंसा केली.

२००२ मध्ये ऐश्वर्याने पहिल्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. त्यावर्षी नीता लुल्लाने डिझाईन केलेली पिवळी साडी आणि त्यासोबत हेवी ज्वेलरी घालून ती रेड कार्पेटवर उतरली होती.

२००३ मध्ये ऐश्वर्या पुन्हा एकदा नीता लुल्लाची साडी घालून कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली. पण तिच्या या लूकने सगळ्यांनाच निराश केले होते.

२००४ मध्ये नीना लुल्लाने डिझाईन केलेला रिव्हीलिंग गाऊन घालून ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली. तिचा हा लूकही अनेकांना खटकला होता.

२००५ मध्ये ऐश्वर्याने नीना लूल्लाच्या आऊटफिटला वगळून जॉर्जिओ अरमानीने डिझाईन केलेला ड्रेस कॅरी केला आणि तेव्हा कुठे पहिल्यांदा तिच्या लूकवर लोक भाळलेत.

२००६ मध्ये ऐश्वर्याने नेव्ही ब्लू कलरचा गाऊन आणि आगळावेगळा नेक पिस घालून कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. तिचा हा लूकही लोकांना भावला.

२००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. लग्नाच्या या वर्षात ती हबी अभिषेकच्या हातात हात घालून कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली.

२००८ मध्ये ऐश्वर्या पुन्हा एकदा अभिषेकसोबत दिसली. पण यावेळचे कान्समधील तिच्या लूकने चाहत्यांना निराश केले होते.

२००९ मध्ये ऐश्वर्याचा लूक तिचा तेव्हापर्यंतचा सगळ्यांत बेस्ट रेड कार्पेट अपीरन्स होता.

२०१० मध्ये ऐश्वर्याने ‘रावण’ हा चित्रपट कान्समध्ये प्रमोट केला होता. यावर्षी एली साबने डिझाईन केलेला गाऊन घालून ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली होती.

२०११ मध्ये पुन्हा एकदा ऐश्वर्याने एली साबच्या डिझाईनची निवड केली होती.

२०१२ मध्ये ऐश्वर्या कान्समध्ये पोहोचली तेव्हा ती एका मुलीची आई झाली होती. प्रेग्नंसीदरम्यान तिचे वजन कमालीची वाढले होते. अशाच प्लस साईज फिगरमध्ये ती कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली होती.

२०१३ मध्ये ऐश्वर्या पुन्हा आपल्या जुन्या फिगरमध्ये परतली आणि तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

२०१४ मध्ये ऐश्वर्या रॉबर्ट कवेलीने डिझाईन केलेला गाऊन घालून रेड कार्पेटवर उतरली होती.

२०१५ मध्ये ती ग्लॅमरस अवतारात दिसली होती.

२०१६ मध्ये ऐश्वर्याच्या कान्समधील लूकची जोरदार चर्चा झाली होती. याला कारण होते तिचे पर्पल लिपस्टिक़ यावरून ऐशला ट्रोलही केले गेले होते.

२०१७ मध्ये ऐश्वर्याचा सिन्ड्रेला लूकमध्ये कान्समध्ये दिसली होती.

हा फोटो आहे २०१८चा. म्हणजे गतवर्षीच्या कान्स महोत्सवाचा. गतवर्षी एक लॉन्चे ट्रेंच गाऊन घालून ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली होती. तिच्या या ड्रेसवरून लोकांनी तिची मजा घेतली होती. ऐश्वर्याचे हे लूक मॉडर्न होते. पण यावरूनही लोकांनी तिची खिल्ली उडवली होती.

Web Title: Aishwarya Rai Bachchan’s best and worst looks at Cannes Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.